Homeक्राईमअहमदनगर व औरंगाबाद जिल्ह्यातील दुचाकी चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी १७ दुचाकीसह जेरबंद...

अहमदनगर व औरंगाबाद जिल्ह्यातील दुचाकी चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी १७ दुचाकीसह जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा आणि भिंगार कॅम्पची कामगिरी

advertisement

अहमदनगर दि.५ ऑगस्ट

अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यातील दुचाकी चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी पकडण्यात नगरच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि भिंगार कॅम्प पोलिसांना यश आले असून या टोळी कडून सुमारे ६,८५,०००/- रुपये किमतीच्या सतरा (१७) दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहे.

पोलिसांना मिळालेल्या माहिती नुसार शेख अकिल व त्याचा साथीदार हा चोरीच्या मोपेडवरून औरंगाबादरोडने अहमदनगरकडे येत असल्याची माहिती मिळाली त्या नुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि / दिनकर मुंडे,, सफौ/मनोहर शेजवळ, पोहेकॉ/ संदीप घोडके, संदीप पवार, दत्तात्रय गव्हाणे, देवेंद्र शेलार, सखाराम मोटे, पोना / ज्ञानेश्वर शिंदे, भिमराज खर्से, शंकर चौधरी, संदीप चव्हाण, लक्ष्मण खोकले, दिपक शिंदे, भानुदास खेडकर, राहुल व्दारके, पोकॉ/ विनोद मासाळकर, योगेश सातपुते, मेघराज कोल्हे, महादेव निमसे,पोहेकॉ/ संभाजी कोतकर व संजय काळे यांच्या पथकाने नगर औरंगाबाद रोडवरील हॉटेल सनी पॅलेस येथे जावुन, वेशांतर करुन सापळा लावुन थांबले असतांना एका मोपेडवर दोन इसम येतांना दिसले. त्यानं थांबवायचा ईशारा करताच त्यांनी गाडी जोराने घेवुन नगरच्या दिशेने पळुन जावु लागले. संशयीतांचा पाठलाग सुरु असतांना पथकाने भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सपोनि / देशमुख यांना सदर घटने बाबत माहिती कळवुन संशयीत इसमांना ताब्यात घेणे बाबत मदत घेतली. दरम्यान स्थागुशा पथकाने मोटार सायकल वरील संशयीत इसमांचा पाठलाग करुन दोन्ही संशयीत इसमांना ताब्यात घेतले. शेख अकिल शेख खलील वय ४९, रा. भवानीनगर, जिल्हा औरंगाबाद,शेख मंजुर अनिस अहमद वय ३१, रा. भवानी नगर, जिल्हा औरंगाबाद असे पकडलेल्या दोन चोरट्यांची नावे असून त्यांच्या ताब्यातील विना नंबर अॅव्हीएटर मोपेड ही नगरच्या स्टेट बॅक,येथुन दोघांनी मिळुन चोरी केली बाबत माहिती दिली.

या दोन्ही दुचाकी चोरट्यांची चौकशी केली असता त्यांनी आपले साथीदार मुकर्रम मुस्तफा सय्यद, रा. भवानीनगर,आयुव याकुब सय्यद (फिटर) रा. विळद पाण्याचे टाकी जवळ ता. नगर) असे आहेत असे सांगितले पोलिसांनी या टोळी कडून सुमारे १७ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

अहमदनगर जिल्हा व औरंगाबाद जिल्हयातील गुन्ह्यांची माहिती घेतली असता या आरोपींनी दिलेल्या
माहिती वरुन एकुण ०९ गुन्हे दाखल आहेत. सर्व गुन्हे पकडलेल्या आरोपींनी आणि त्यांच्या साथीदारांनी मिळुन केले असल्याचे निष्पन्न झाले आहेत.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular