Homeक्राईमgold pledge scam अहमदनगर शहरातील अत्यंत जुन्या आणि नावजलेल्या "या" बँकेत...

gold pledge scam अहमदनगर शहरातील अत्यंत जुन्या आणि नावजलेल्या “या” बँकेत बनावट सोनेतारण घोटाळा आला समोर

advertisement

अहमदनगर दि.७ सप्टेंबर

अहमदनगर शहरातील नावाजलेल्या शहर सहकारी बँकेच्या(shahar shkari bank) सोने तारण(gold pledge ) विभागात मोठा घोटाळा झाल्याचं समोर आले आहे. शहर सहकारी बँकेत खोटे सोने तारण ठेवून कर्ज प्रकरण करून बँकेला फसवल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे . खोटे सोने (fake gold) ठेवून लाखो रुपयांचे कर्ज घेण्याचा हा प्रकार समोर आला आहे.या प्रकरणी शहर सहकारी बँकेचे मॅनेजर दिनेश कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून विशाल चिपाडे, ज्ञानेश्वर कुताळ ,सुनील आळकुटे ,अजय कापाले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सुमारे 26 लाख 63 हजार रुपयांचा हा घोटाळा असल्याचं समोर आला आहे.

.यावर आता पोलीस तपास करणार असून या घोटाळ्यामध्ये अजून कोण सामील आहेत का याबाबत पोलीस(police ) तापासामध्ये सर्व बाबी समोर येतील. या गुन्ह्याचा तपास पीएसआय गजानन इंगळे करत आहेत.

मात्र अहमदनगर शहरातील अर्बन बँकेनंतर शहर सहकारी बँकेतही खोटे सोने तारण ठेवून कर्ज घेतल्याचा प्रकार झाल्याने सभासदांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून पोलीस अत्यंत गोपनीय पद्धतीने या प्रकरणाचा तपास करत होते . अखेर बुधवारी रात्री कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचबरोबर अहमदनगर शहरातील आणखी एका बँकेत असेच प्रकरण झाल्याची चर्चा आहे.

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular