Homeक्राईममनपा अतिक्रमण पथकावर दगडफेक प्रकरणी आठ लोकांवर सरकारी कामात अडथळा सह जीवे...

मनपा अतिक्रमण पथकावर दगडफेक प्रकरणी आठ लोकांवर सरकारी कामात अडथळा सह जीवे मारण्याचा प्रयत्न करणे कलाम खाली गुन्हा दाखल

advertisement

अहमदनगर दि.१२ जुलै
महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकावर झालेल्या हल्ला प्रकरणी प्रभाग अधिकारी मेहेर गंगाधर लहारे यांच्या विरोधी वरून सादिक बाबुलाल शेख , सोफीयान सादिक शेख , अजहर सादिक शेख ,अलीज सादिक शेख , आसीफ नुरमोहंमद कुरेशी, शहेबाज जब्बार कुरैशी , निसार तांबोळी,अमजद जब्बार कुरेशी, निसार कुरेशी (भंगारवाला) आणि त्यांचे इतर 5 ते 6 अनोळखी साथीदार यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात भदवी कलम353,307,308,124,आदी कलमा खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

झेंडीगेट येथील राजु शेख यांच्या तक्रार अर्जावरून अहमदनगर शहरातील बाबा बंगाली हिंदुस्थान गरेजच्या शेजारील पत्रयाचे अतिक्रमीत झालेले शेडची पाहणी करून ते पाडण्यासाठी जेसीबी घेवुन अतिक्रमण पथक गेले असता त्या ठिकाणी 45 ते 50 लोक जमा झालेले होते. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या लोकांपैकी 12 ते 15 लोकांनी अतिक्रमण पथकाला सदरचे अतिक्रमण काढण्यासा विरोध करुन वाद घालण्यास सुरुवात केली.

तरी अतिक्रमण काढण्याचे काम चालु ठेवले तेव्हा त्या 12 ते 15 लोकांनी प्रभाग अधिकारी मेहेर लहारे यांच्या सह देविदास भिमराज बिज्जा, आणि बिगारी नामे राहुल तनपुरे, दत्ता जाधव, तुकाराम कोतकर, सुभाष झारेकर, अशोक रकटे, असलम गुलाब शेख, विलास नरसाळे, सुरेश विठठल भुतकर, बाळासाहेब पोपट रोहोकले यांना ल शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आणि तेथे अतिक्रमण पाडलेल्या ठिकाणचे लहान मोठे दगड आणि विटा उचलुन अदांधुद आमचे पथकावर मारुन फेकण्यास सुरुवात केली. त्या दगड फेकीमध्ये पथकातील जेसीबीची उजव्या खिडकीची काचा फुटुन सुमारे 1 हजार रुपयाचे नुकसान झाले असुन एक विट पथकात बिगारी म्हणून कर्तव्यावर हजर असलेले आणि जेसीबीमध्ये बसुन शासकीय कामात अडथळा आणणारे आणि दगडफेक करणारे लोकांची त्यांचे मोबाईल फोन मधील कमे-यादवारे शुटींग घेत असणारे बिगारी नामे दत्ता केशव जाधव वय-54 वर्षे यांचे डोक्यात लागली आणि त्यात ते गंभीर जखमी झाले आशा आशयाची फिर्याद कोतोली पोलीस ठाण्यात देण्यात आली असून

पोलिसांनी काही लोकांना ताब्यात घेतली ची माहिती समजत आहे जोपर्यंत सर्व आरोपी अटक होत नाही तोपर्यंत अहमदनगर महानगरपालिकेच्या चार झोन मधील कामकाज बंद राहील असा इशारा कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी दिला आहे

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular