Homeक्राईमविविध शहारत १४ गंभीर गुन्हे दाखल असलेला शुभम काळे सह त्याची टोळी...

विविध शहारत १४ गंभीर गुन्हे दाखल असलेला शुभम काळे सह त्याची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली जेरबंद

advertisement

अहमदनगर दि.१९ ऑगस्ट
नगर शहारा जवळील एमआयडीसी परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या राहाता परिसरातील गणेश नगर येथील टोळी तलवार, दांडके, दोरी व मिरचीपुड अशा साधनासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली आहे.

या घटनेची हकीकत अशी की पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार फरार आणि पाहिजे असलेल्या आरोपींचा स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक शोध घेत असताना
माहिती मिळाली की, एक सराईत आरोपी राहुल काळे हा त्यांचे साथीदारांसह वडगांवगुप्ता शिवारातील एमआयडीसी ते शेंडी औरंगाबाद रोडवर, डेंटल कॉलेजकडे जाणाऱ्या रोडवर,, रस्त्याने येणारे जाणारे वाहन चालकांना आडवुन लुटमार करुन, दरोडा घालण्याचे तयारीत रस्त्याचे कडेला अंधारात बसलेले आहे. या माहितीच्या आधारे सपोनि / दिनकर मुंडे, पोहेकॉ/ सुनिल चव्हाण, बापुसाहेब फोलाणे, देवेंद्र शेलार, पोना/शंकर चौधरी, संतोष लोढे, सचिन आंडबल, भिमराज खसे, पोकॉ/ विनोद मासाळकर, जालिंदर माने व पोहेकॉ/ बबन बेरड अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथकाने बायपास रोडवर जाऊन मिळालेल्या माहितीनुसार खात्री केली असता त्या ठिकाणी असलेले संशयित इसम पोलिसांना पाहून पळून जाऊ लागले. पथकाने त्यांचा पाठलाग करुन चार (०४) इसमांना ताब्यात घेतले व इतर दोन (०२) संशयीत इसम अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेले.

ताब्यात घेतलेल्या इसमांना नावे राहुल अनिल काळे वय २९,रा. गणेश नगर, ता. राहाता हल्ली रा. नायगांव खंडेवाडी, ता. पैठण, जिल्हा औरंगाबाद,शुभम अनिल काळे वय२४, भरत तात्याजी काळे वय २४, विकास शेखर जाधव वय २०, सर्व रा. गणेश नगर, ता. राहाता असे असून पळून गेलेल्या इसमांची नावे अक्षय यशवंत आव्हाड (फरार), आनंदा अनिल काळे (फरार) दोन्ही रा. गणेश नगर, ता. राहाता असे असून तसेच ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून एक तलवार, लाकडी दांडके, दोरी, मिरचीपुड, तीन मोबाईल फोन असा एकुण ३०,०००/- रु. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

आरोपींना एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून त्यांच्या विरोधात भादविक ३९९, ४०२ सह आर्म अॅक्ट ४/२५ प्रमाणे दरोडा तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.यातील आरोपी शुभम अनिल काळे हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर, नाशिक, धुळे व सातारा जिल्ह्यात दरोडा तयारी, जबरी चोरी, घरफोडी व चोरी असे गंभीर स्वरुपाचे १४ गुन्हे दाखल आहेत.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular