Homeशहरसहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ शहर वाहतूक शाखेचे नवीन कारभारी तर त्या...

सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ शहर वाहतूक शाखेचे नवीन कारभारी तर त्या दोन कर्मचाऱ्यांची तडका फडकी मुख्यलयात बदली

advertisement

अहमदनगर दि.११ जुलै

मागील महिन्यात परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक बीजी शेखर पाटील यांच्या उपस्थितीत अहमदनगर शहरातील काही मान्यवरांची एक बैठक घेण्यात आली होती. यामध्ये पत्रकारांचाही समावेश होता यावेळी शहरातील वाहतूक परिस्थितीबाबत ज्येष्ठ पत्रकार महेंद्र कुलकर्णी यांच्या सह काही मान्यवरांनी  भूमिका मांडताना शहर वाहतूक पोलिसांच्या कामकाजाबाबत खरी परिस्थिती दाखवून दिली होती शहरातील वाहतुकीची बिघडलेली परिस्थिती आणि त्यामुळे होणारे अपघात आणि बेशिस्त वाहतूक यामुळे वैतागलेले नगरकर याबाबत अनेक वक्त्यांनी उधारणासह आणि फोटो सह  विनंती वजा तक्रार बी.जी. शेखर यांच्याकडे बैठकीच्या दरम्यान भाषणामध्ये केली होती.

तसेच शहरातील सुरू असलेल्या उड्डाण पुलाच्या कामामुळे शहरात सध्या वाहतूक खोळंबा हा नित्यचा झालेला आहे. उड्डाणपुलाच्या कामामुळे शहरातून अवजड वाहतुकीस बंदी घातलेली आहे. मात्र रात्री 12 नंतर सर्रास सर्व खाजगी प्रवासी वाहतुकीच्या गाड्या शहरातून जात असल्याचे चित्र वेळोवेळी पाहायला मिळत होते. तसेच दिवसाही अनेक अवजड मालवाहतूक गाड्या शहरातून जाताना दिसून येत होत्या याबाबत आमदार संग्राम जगताप यांनी शहर वाहतूक पोलीस ठाण्यात येऊन याबाबत शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांना चचांगलेच फैलावर घेतले होते.

तर त्यानंतर काही दिवसांपूर्वी शहर वाहतूक शाखेसमोरच अवजड वाहनाच्या धडकेमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला होता यावेळी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी राजेंद्र भोसले यांना निवेदन देऊन अवजड वाहतूक शहरातून बंद करा याबाबत निवेदन दिले होते. मात्र त्यानंतरही शहरातील अवजड वाहतूक बंद झाली नव्हती.

काही पोलिसांच्या तक्रारी पोलीस अधीक्षकांपर्यंत गेल्यानंतर स्वतः पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी मागील महिन्यात शहर वाहतूक पोलीस शाखेत येऊन झाडाझडती घेतली होती. तसेच शहर वाहतूक पोलीस निरीक्षकांसह काही कर्मचाऱ्यांच्या कामांवर नाराजी व्यक्त केली होती. मात्र संधी देऊनही कामकाजात सुधारणा न झाल्याने अखेर शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी सहह्याक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांना वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर पोलीस अंमलदार संजय गवळी आणि मोहम्मद अली सय्यद यांची तडकाफडकी मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular