Homeशहरजेष्ठ पत्रकार विठ्ठल लांडगे यांची अहमदनगर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी निवड

जेष्ठ पत्रकार विठ्ठल लांडगे यांची अहमदनगर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी निवड

advertisement

अहमदनगर दि.८ ऑगस्ट
दैनिक लोकआवाजचे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल लांडगे यांची अहमदनगर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून निवडी बाबतची घोषणा अहमदनगर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा दैनिक नवामराठाचे संपादक सुभाष गुंदेचा यांनी केलीय.

विठ्ठल लांडगे गेली २३ वर्षे नगर जिल्ह्यातील पत्रकारितेमध्ये कार्यरत आहेत. दैनिक लोकयुग या स्थानिक वर्तमानपत्रातून त्यांनी पत्रकारितेस प्रारंभ केला. त्यानंतर दैनिक प्रभात, दैनिक सार्वमत, दैनिक पुढारी व दैनिक सकाळमध्ये मुख्य बातमीदार, वृत्तसंपादक, ते आता दैनिक लोक अवाज या वृत्तपत्राचे मुख्य संपादक मालक असा त्यांचा प्रवास राहिला आहे. तसेच जिल्हा पत्रकार संघाचे सहसचिव ,श्रमिक पत्रकार संघाचे सदस्य आणि विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.

विठ्ठल लांडगे यांच्या पत्रकारितेच्या कारकिर्दीत आत्तापर्यंत अखिल भारतीय धम्म परिषदेचा आदर्श पत्रकार पुरस्कार (2007), दैनिक सार्वमत वर्तमानपत्राकडून गुणवंत पत्रकार’ म्हणून गौरव (2008), शिवशंभो ट्रस्टचा शिवशंभो पत्ररत्न पुरस्कार (2008),मराठा महासंघाकडून उत्कृष्ट पत्रकार गौरव’ (2008), दिवंगत वसंतराव देशमुख जिल्हास्तरीय विशेष पत्रकारिता पुरस्कार’,अहमदनगर प्रेस क्लबतर्फे अजिजभाई सामाजिक पत्रकारिता पुरस्कार’(2012) आशा विविध पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला आहे.

विठ्ठल लांडगे यांची जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे जिल्ह्यातील पत्रकारांसाठी भविष्यात मोठे काम करणार असून पत्रकारांच्या विविध प्रश्नांसाठी सरकार दरबारी पाठपुरावा करणार करून प्रश्न सोडवण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे विठ्ठल लांडगे यांनी निवड झाल्यानंतर सांगितले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular