Homeशहरमहत्वाची बातमी - पाणी जपूनच वापरा पुन्हा होणार पाणी पुरवठा विस्कळीत

महत्वाची बातमी – पाणी जपूनच वापरा पुन्हा होणार पाणी पुरवठा विस्कळीत

advertisement

अहमदनगर दि. ३ नोव्हेंबर

शनिवार दि. ०५/११/२०२२ रोजी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी यांचेकडून ३३ के. व्ही. मुळा डॅम वाहिनीच्या दुरुस्ती कामासाठी सकाळी ११.०० ते ०५.०० वाजेपर्यत शट डाउन घेण्यात येणार आहे. त्यामुळे वीजेअभावी मुळानगर, विळद या ठिकाणाहून उपसा होणारे पाणी बंद राहणार आहे. उपसा बंद राहणार असल्याने शहर पाणो वितरणासाठीच्या टाक्या भरता येणार नाहीत. तसेच सदर शट डाउन वेळेत अहमदनगर महानगरपालिकेच्या शहर पाणीपुरवठा योजनेवरील महत्वाची दुरुस्तीची कामे शनिवार दि. ०५/११/२०२२ रोजी सकाळी ११.०० ते सायं.०५.०० वाजेपर्यंत घेण्यात येणार आहेत. घेण्यात येणा-या ‘ शट डाउन ‘ मुळे शनिवार दि. ०५/११/२०२२ रोजी बोल्हेगाव, नागापूर,सावेडी उपनगरातील गुलमोहर रोड, पाईपलाईन रोड, लक्ष्मीनगर, सुर्यनगर, निर्मलनगर, मुकुंदनगर तसेच सारसनगर, बुरूडगाव रोड, केडगाव, नगर-कल्याण रोडवरील शिवाजीनगर भागास [सकाळी ११.०० नंतरच्या पाणी वाटपाच्या भागास] पाणीपुरवठा होउ शकणार नाही..
सदरचा पाणीपुरवठा हा रविवार दि.०६/११/२०२२ रोजी करणेत येईल.

तसेच रविवार दि. ०६/११/२०२२ रोजी रोटेशननुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजेच सिध्दार्थनगर, लालटाकी, तोफखाना, दिल्लीगेट, नालेगाव, चितळे रोड, आनंदी बाजार, कापड बाजार, ख्रिस्त गल्ली, पंचपीर चावडी, जुने मनपा कार्यालय परिसर, माळीवाडा,
बालिकाश्रम रोड परिसर व सावेडी इत्यादी भागात महानगरपालिकेमार्फत पाणीपुरवठा करण्यात येणार नाही. या भागातील पाणीपुरवठा हा रविवार ऐवजी सोमवार दि. ०७/११/२०२२ रोजी करण्यात येईल.
सोमवार दि. ०७/११/२०२२ रोजी पाणीपुरवठा होवू घातलेल्या शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजेच मंगलगेट, रामचंद्रखुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, बंगाल चौकी, माळीवाडा, कोठी या भागात व गुलमोहर रोड, प्रोफेसर
कॉलनी परिसर, सिव्हील हाडको, प्रेमदान हाडको, म्युनिसीपल हाडको, स्टेशन रोड, विनायक नगर
इत्यादी भागात पाणीपुरवठा होणार नसून तो मंगळवार दि.०८/११/२०२२ रोजी करण्यात येईल.

शहरातील पाणीपुरवठा एक दिवस बंद करून उपनगरात ज्या भागात जास्त दिवसाचे रोटेशन आलेले आहे, अशा भागात पाणीपुरवठा करण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे. तरी नागरीकांनी याची नोंद घेवून असलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे मनपाने दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हंटले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular