Homeविशेषफकीराच्या वस्तीला कोणाला अशांत करायचंय नगर शहरात नेमकं चाललं काय आधीच लॉकडाऊन...

फकीराच्या वस्तीला कोणाला अशांत करायचंय नगर शहरात नेमकं चाललं काय आधीच लॉकडाऊन मुळे विस्कटलेली घडी सुरळीत होत असताना का घातला जातोय हा धुडगूस या मागचा खरा सूत्रधार कोण ?

advertisement

अहमदनगर दि १७ एप्रिल

फकीरांची वस्ती म्हणून अहमदनगर शहराची ओळख आहे मात्र या फकीराच्या वस्तीमध्ये सध्या अशांतता निर्माण निर्माण करण्याचा कोणी तरी प्रयत्न करत आहे नेमकं कोण करतय या बाबत सर्व बाजूनी शोध घेणे गरजेचे आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरामध्ये धार्मिक तेढ वाढवायचा प्रयत्न अज्ञात शक्ती करत आहे. शहरात कोणतीही घटना घडली तर त्या घटनेला थेट जातीय धार्मिक स्वरूप देण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र यामुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे आणि व्यापाऱ्यांमध्ये भीती वाढत चालली आहे कारण कुठेही गोंधळ झाला तर याचा पहिला फटका हा व्यवसायिकांना बसतो हा आजपर्यंतचा इतिहास आहे.

शहारत कापडबजार येथे अनेक वर्षांपासून सर्वधर्मीय व्यवसायिक अनेक वर्षांपासून गुना गोविंदाने व्यवसाय करत होते मात्र एका चुकी मुळे थेट पथविक्रेते आणि स्थानिक व्यापारी यांच्यामध्ये चांगलाच संघर्ष पाहण्यास मिळाला होता.

त्यानंतर दोन वर्षानंतर सध्या सर्वच सण आणि उत्सव महामनवांच्या जयंती मोठ्या धुमधडाक्यात साजरे होत आहेत त्यामुळे अनेक मिरवणूका शहरात पाहायला मिळत आहेत आणि या मिरवणुकांमध्ये मोठ्या संख्येने लोक सामील होत आहेत. मात्र काही लोकांना या मधून काहीतरी चुकीचे करायचे आहे हे वारंवार होणाऱ्या ठरविक कृत्या मधून दिसून येतंय ठरविक घोषणा देऊन धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न वारंवार होतोय या मागे नक्कीच अज्ञात शक्ती आहे हे नक्की.

अलीकडच्या काळात काही नवीन चेहरे शहारत दिसू लागले आहेत हे चेहरे कुठून आले कशासाठी आले आणि या चेहऱ्यांचा नगर मध्ये येण्याचा काय संबंध करण हे चेहरे सर्व अनोळखी असून या चेहऱ्या मागे नक्की काय लपलेल आहे हे पोलीसांना शोधून काढणे गरजेचे आहे.

बेरोजगारी आणि वाढती महागाई या मुळे सर्वसामान्य कुटुंबातील लोक आशा गोष्टीपासून दूरच असतात मात्र काही लोक या सर्वसामान्य बेरोजगारी आणि तरुणाई चा फायदा घेऊन काही आमिष दाखवून हातात पेन देण्याऐवजी दगड देतात आणि मग तो दगड कुठे भिकवला जातो हे कोणालाच समजत नाही आजकालच्या तरुणांना धर्म आणि जात यात गुंतवून त्यांच्याकडून चुकीचे काहीही करून घेण्याची जणू स्पर्धाच लागली आहे मात्र त्यांचं भविष्य अंधकारमय होतोय हे कोणाच्याच कसे लक्षात येत नाही हे विशेष.

मागील काही घटनांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत आणि या गुन्ह्यांमध्ये आरोपी झालेल्या तरुणांचे वय पाहिले तर धक्का बसल्याशिवाय राहत नाही 20 ते 25 वयोगटातील तर काही अल्पवयीन मुलं यात सामील असल्याचं समोर आलंय त्यामुळे आपली तरुण पुढे आपण कुठे नेतोय हे त्या अज्ञात शक्तीला कळायला पाहिजे.

ज्या गोष्टी घडल्याच नाही त्याच राजकारण सध्या अहमदनगर जिल्ह्यात चालू आहे ज्यांना नगर शहर अशांत करायचंय ते साध्य झेंड्याचे दांडे तरुणांच्या हाती देऊन मजा पाहत आहेत कारण कधी नव्हे ते एकसारख्याच घटना जिल्ह्याच्या विविध भागात घडत आहेत तर दुसरीकडे ज्या गोष्टी घडल्याचं नाहीत त्याची चर्चा करून तेढ वाढवायचा प्रयत्न सुरू आहे मात्र त्याच्या मुळाशी गेले तर हाती काहीच लागत नाही ही वस्तूस्थिती आहे.

पोलिसांचा ताण दिवसेंदिवस वाढत चालला असून कमी मनुष्यबळात आणि राजकीय प्रेशर खाली काम करताना पोलीस दलाची दमछाक होतेय. कोणतीही अनुचित घटना घडली तर पोलिसांचा गुप्तहेर विभाग आणि पोलीस नागरिकांच्या रोषाला बळी पडत असतात आज-काल सोशल मीडियामुळे पोलिसांसमोर हे मोठं आव्हान उभारायला हे सांकेतिक मेसेज आणि तंत तंत्रज्ञानाच्या मदतीने आज काल काही गोष्टी घडल्या जातात त्यामुळे पोलिसांना अशा लोकांचा शोध घेणे कठीण झाले आहे.

या फकिराच्या वस्तीत जो उन्मात करतो तो मातीत जातो असं बोललं जातं त्याप्रमाणे नगर शहराला जो कोणी अशांत करण्याचा प्रयत्न करत आहे तो नक्कीच एक दिवस मातीत जाईल मात्र नगरकरांनी सुद्धा आता भूलथापांना आणि जातीवादाला थारा न देता सर्वधर्मसमभाव जपणे गरजेचे आहे.

advertisement

1 COMMENT

  1. गेल्या आठ दिवसात जे दंगल घडवण्याचे प्रकार घडले आहेत ते कुणी केले आणी कश्यासाठी केले हे पोलीस बांधवांना व सर्व नगरकरांना चांगले माहिती आहे. आणी त्या ठिकाणचे व्हिडिओ सुद्धा पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
    प्रभू श्रीराम यांच्या शोभायात्रेत पंचपीर चावडी व तेली खुंट भागात दंगलखोर समाजकंटकांचा जमाव कश्यासाठी जमा झाला होता याचे आत्मपरीक्षण आधी करा.श्रीराम नवमीची शोभायात्रा शांततेत जात असताना दंगल घडवण्याच्या उद्देशाने माथी भडकतील अश्या जातीयवाचक घोषणाबाजी कोणी केली याचे सर्व व्हिडीओ सोशल मीडियावर उपलब्ध आहेत जे पोलिसांना मिळाले आहेत. त्यामुळे पोलीस बांधव जबाबदार लोकांवर योग्य कारवाई करतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular