अहमदनगर दिनांक ९ ऑक्टोबर
अहमदनगरच्या जुन्या महानगरपालिकेच्या कार्यालयावर दोन दिवसांपूर्वी अहमदनगर नाव खोडून अहिल्यानगर महानगरपालिका असे रंगवण्यात आले होते मात्र आता दोनच दिवसात हे नाव पुन्हा खोडण्यात आले आहे या मुळे नगर शहरात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे महसूल विभागाची अधिसूचना निघाली नसताना अहिल्यानगर नाव घाईघाईने रंगवण्यात आल्याची तक्रार एका सामाजिक कार्यकर्त्यांने केली होती. यानंतर लगेच महानगरपालिकेने अहिल्यानगर नाव खोडल्याने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.
याबाबत अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले की अहिल्यानगर नाव रंगवल्यानंतर त्यावर रंगाचे डाग पडल्यामुळे पुन्हा साफसफाई करून नवीन नाव रंगवण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त डांगे यांनी दिले आहे.