HomeUncategorizedअहमदनगर जिल्हा पोलीस घटकातील ई-टपाल आणी २ प्लस या उपक्रमांना श्री अधीकारी...

अहमदनगर जिल्हा पोलीस घटकातील ई-टपाल आणी २ प्लस या उपक्रमांना श्री अधीकारी ब्रदर्स इंटरप्रायजेस चा गव्हर्नन्स नाऊ २nd “इंडीया पोलीस समिट अॅण्ड अवार्ड्स २०२२” पुरस्कार प्राप्त

advertisement

अहमदनगर दि.१५ जुलै

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील अपर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्हा पोलीस दलामध्ये २ प्लस प्रणाली यशस्वीपणे राबविणे करीता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  अनील कटके यांचे नेतृत्वाखाली सपोनि कैलास वाघ, पोहेकॉ आंबादास शिंदे, पोकॉ मच्छींद्र बर्डे, पोकॉ विजय धनेधर यांनी विशेष परीश्रम घेतले आहेत. तसेच ई टपाल प्रणाली यशस्वीपणे राबविणे करीता सायबर पोलीस स्टेशनचे पोसई प्रतिक कोळी, यांचे नेतृत्वाखाली पोकॉ अमोल गायकवाड, पोकॉ सम्राटगायकवाड यांच्या परिश्रमाने अहमदनगर जिल्हा पोलीस दलाच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला आहे.अहमदनगर जिल्हा पोलीस घटकातील ई-टपाल आणी २ प्लस या उपक्रमांना श्री अधीकारी ब्रदर्स इंटरप्रायजेस चा गव्हर्नन्स नाऊ २nd “इंडीया पोलीस समिट अॅण्ड अवार्ड्स २०२२” पुरस्कार प्राप्त झालं आहे.

.स्मार्ट पोलिसिंग  या संकल्पनेतून पोलीस दलातील नावीण्यपुर्ण तत्रंज्ञानाला वाव मिळण्यासाठी  अधीकारी ब्रदर्स इंटरप्रायजेस या संस्थेकडून गव्हर्नन्स नाऊ इंडीया पोलीस समिट ॲण्ड अवार्ड आयोजीत करण्यात येतो. सदर अवार्ड करीता देशातील सर्व पोलीस घटकांकडून १) बाडर्र मॉनेजमेंट २) चाईल्ड सेफटी ३) कमांड अॅड कंट्रोल सेंटर ४) कम्युनिटी पोलीसींग ५) क्राइम इनव्हेस्टीगेशन अॅड प्रासेक्युशन ६) सायबर क्राईम ७) इंटेलीजन्स कलेक्शन ८) पोलीस मॉर्डनायझेशन ९) पब्लीक प्रोक्युरमेंट इन इंटरनेट सिक्युरीटी १०) रोड सेफटी अॅण्ड ट्राफीक मॅनेजमेंट ११) स्मार्ट पोलीस स्टेशन १२) सव्हिलंस ॲण्ड मॉनिटरींग १३) टेक्नॉलॉजी १४) ट्रेनिंग अॅण्ड कपॅसीटी बील्डींग १५) वुमन सेफ्टी १६) डिजास्टर्स मॅनेजमेंट या श्रेण्याअतंर्गत त्यांच्याकडील नावीण्यपुर्ण तत्रज्ञाना बाबत प्रस्ताव मागवुन त्यातुन निवड केलेल्या प्रस्तावांना अवार्ड देण्यात येतो.

अधीकारी ब्रदर्स इंटरप्रायजेस या संस्थेकडून वरील
श्रेण्यांकरीता देशातील एकुण ४३ पोलीस घटकांना त्यांच्या नावीण्यपुर्ण यांजनेकरीता गव्हर्नन्स नाऊ २
इंडीया पोलीस समिट ॲण्ड अवार्ड २०२२ देण्यात आला त्यात आंध्र प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात, जम्मु, तेलंगाना, दिल्ली, हिमाचल प्रदेश, ओडीसा आणी महाराष्ट्र राज्यातील पोलीस घटकांना समावेश आहे. महाराष्ट्रातील अहमदनगर, सोलापुर आणी नागपुर यांना वरील अवॉर्ड मिळाला आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular