Homeक्राईमकदम बंधूंच्या बिंगो जुगार अड्ड्यावर शहर पोलीस उपअधीक्षक कातकडे यांच्या पथकाचा छापा

कदम बंधूंच्या बिंगो जुगार अड्ड्यावर शहर पोलीस उपअधीक्षक कातकडे यांच्या पथकाचा छापा

advertisement

अहमदनगर दि.२५ जून
अहमदनगर शहरातील माळीवाडा भागातील जिल्हा परिषदेच्या संरक्षण भिंतीच्या लगत अतिक्रमण करून सुरु असलेल्या बिंगो जुगार अड्ड्यावर शहर उपाधीक्षक अनिल कातकडे यांच्या पथकाने छापा टाकून 32 हजरांच्या मुद्देमालासह बिंगो जुगार चालवणाऱ्या दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

नगर शहरातील माळीवाडा भागात चोरीछुपे बिंगो नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती शहर उपाधीक्षक अनिल कातकडे यांच्या पथकाला कळल्यानंतर पोना/१६६९ हेमंत खंडागळे, सफौ/ दत्तात्रय शिंदे,पोहेकॉ/२०११ तनविर शेख, पोकॉ/२३७९/ सागर राजेंद्र द्वारके पोना/४९९ महेश मगर यांच्या पथकाने माळीवडा भागात जाऊन जिल्हा परिषदेसमोरील संरक्षण भिंतीला लागून असलेल्या एका टपरी मधील बिंगो जुगार अड्ड्यावर छापा टाकून बिंगो जुगार खेळवणारे रोहित रविंद्र कदम वय २९ रा. दिपक वाईन शेजारी, जिल्हा परिषद समोर, बौध्द वस्ती, माळीवाडा, अहमदनगर २) आकाश प्रकाश कदम वय २६ रा. दिपक वाईन शेजारी, या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे तर इतर खेळणारे खेळाडू पोलिसांची चाहूल लागताच पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. या दोन जणांकडून बिंगो जुगार खेळण्यासाठी लागणारे साहित्य एलईडी टीव्ही मोबाइल व रोख रक्कम असा 32 हजार 780 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सागर राजेंद्र द्वारके यांच्या फिर्यादी नुसार बिंगो जुगर चालवणाऱ्या रोहित आणि आकाश कदम यांच्या विरोधात महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(अ) प्रमाणे कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular