Homeविशेषखाकी वर्दीतील माणूसकी कोतवाली पोलीस स्टेशन मधील त्या कर्मचाऱ्याचे कामाचे होतोय कौतुक

खाकी वर्दीतील माणूसकी कोतवाली पोलीस स्टेशन मधील त्या कर्मचाऱ्याचे कामाचे होतोय कौतुक

advertisement

अहमदनगर दि.२९ एप्रिल

पोलिस म्हटले, की धाक- दपटशा, दंडुका अशी काहीशी आपली समजूत असते. गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी पोलिसांना कधी कधी तसे करावंही लागतं. पण खाकीवर्दीतील देवमाणूसही अनेकदा दिसला.

नगर शहरातील एका घटनेनं खाकी वर्दीतील पोलीस कर्मचाऱ्याच्या कामाच सध्या कौतुक होत आहे.
खाकी वर्दी आणि पोलीस स्टेशन म्हटले की सामन्य माणूस नेहमीच या पासून चार हात दूरच राहणे पसंद करतो मात्र वस्तुस्थिती तशी नसतेच एक माणूस चुकीचा वागत असेल म्हणून सर्व लोक सारखे नसतात अखेर खाकी वर्दीच्या आत माणूसच असतो .

नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचाती रवी टकले यांनी आपल्या माणुसकीचे दर्शन घडवत पोलिसांची मान उंचावली आहे.कोतवाली पोलीस स्टेशन शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने या पोलीस स्टेशनच्या आवारात नेहमीच गर्दी असते अनेक भटकणारे लोक या ठिकाणी सावलीला येऊन बस्तात.

मंगळवारी सकाळी पोलीस कर्मचारी रवी टाकले हे नेहमी प्रमाणे पोलीस ठाण्यात आले असताना त्यांच्या नजरेस एक लहान मुलगा व लहान मुलगी पोलीस स्टेशन च्या बाकड्यावर झोपलेले दिसले त्यांचे चेहरे खुप सुकलेले होते त्या दोघांच्या शेजारी एक महिला बसलेली होती पोलीस कर्मचारी रवी टकले यांनी त्या महिलेला बोलत करत विचारपूस केली त्या महिलेने सांगितले की आमची परस्तिथी खुप गरीब आहे माझ्या मुलांनी रात्री पासून काहीच नाही खाल्ले आम्ही सर्व उपाशी आहोत. थोडाफार खाण्यासाठी भेटले तर खूप बरे होईल.

त्या सरशी रवी टकले यांनी ताबडतोब त्या दोन मुलांसह त्या महिलेला घेऊन हॉटेल मध्ये पोटभर खाऊ घालून त्यांच्या मार्गाकडे रवाना केले जेवण झाल्या नंतर त्या बालकांसह त्यांच्या आईच्या चेहऱ्यावर जो आनंद करोडो रुपये देऊनही न मिळणार होता अशी भावना टाकले याांनी बोलून दाखवलीय पोलिसांच्या वर्दी मध्येही माणूसच असतो आणि माणुसकी अजून जिवंत असल्याचं उदाहरण रवी टकले यांनी घालून दिलेय.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular