HomeUncategorizedनगर शाहरतील शिवसेनेच्या काही नागरसेवकांसह इतर पक्षाचे आजी माजी नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ...

नगर शाहरतील शिवसेनेच्या काही नागरसेवकांसह इतर पक्षाचे आजी माजी नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात जाणार

advertisement

अहमदनगर दि.२० जुलै

राज्यात शिवसेने मधून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे गटाने सध्या राज्यात आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली असून आमदार खासदार त्या पाठोपाठ आता पदाधिकारी आणि आजी-माजी नगरसेवक शिंदे गटात सामील होत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासमोर रोज एक नवीन आव्हान उभे राहत आहे. महाराष्ट्रातील अनेक नगरपालिका महानगरपालिकेच्या नगरसेवकांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे.

त्याच पार्श्वभूमीवर अहमदनगर शहरातही सोमवारी संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एक बैठक घेण्यात आली होती. यावेळी आम्ही सर्व उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे उपस्थित पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सांगितले असले तरी आता अहमदनगर शहरात उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट तयार झाल्याची माहिती समोर येत असून नगर शहरातील शिवसेनेच्या काही नगरसेवकांसह इतर पक्षाचे आजी माजी नगरसेवक असे जवळपास 16 ते 17 नगरसेवक एकनाथ शिंदे गटात जाण्याची शक्यता असून मंगळवारच्या मुहूर्तावर सुथो हे नगरसेवक शिंदे यांची मुंबई जाऊन भेट घेणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळत आहे.त्यामुळे नगर शहरातही आता उद्धव ठाकरे गटाने शिंदे गट असे दोन गट तयार होताना दिसून येत आहेत.त्यामुळे पुन्हा एकदासूथो नगर शहरातही उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटांमध्ये संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. महानगरपालिकेचे राजकारण पाहता शिवसेनेचा महापौर हा राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर उभा असल्याने राष्ट्रवादी आता काय भूमिका घेणार याकडेच सर्वांचे लक्ष लागून आहे.

संपर्कप्रमुखांनी घेतलेल्या सोमवारच्या बैठकीत काही नगरसेवक गैरहजर होते मात्र त्यांच्याशी आपला संपर्क झाल्याचा संपर्कप्रमुखांनी सांगितल असलं तरी नगर शहरामध्ये सोमवारी दुसऱ्या गटाची बैठक झाल्याची खात्रीशीर माहिती सामोर येत आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular