Home शहर शहरतील खराब रस्त्यामुळे आधीच नागरिकांचा रोष असताना नवीन डांबरीकरण झालेल्या रस्त्याला खोदण्याची...

शहरतील खराब रस्त्यामुळे आधीच नागरिकांचा रोष असताना नवीन डांबरीकरण झालेल्या रस्त्याला खोदण्याची मनपा प्रशासनाने दिली परवानगी निखिल वारे आणि बाळासाहेब पवार यांनी केले खड्ड्यात बसून आंदोलन चालू

अहमदनगर दि.२१ जून
देव देतो आणि कर्म नेतो असाच काहीसा प्रकार अहमदनगर महानगरपालिकेत घडत आहे एकीकडे रस्ते खराब असल्यामुळे महानगरपालिका प्रशासन आणि नगरसेवक नेहमीच नागरिकांच्या रोषाला बळी पडत आहेत तर पाठपुरावा करून निधी आणून प्रभागातील रस्ते करण्याचा प्रयत्न काही नगरसेवक करत असतात. मात्र महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराचा फटका या नगरसेवकांच्या कामाला बसत असल्याचे उदाहरण सावेडी उपनगर मधील पाईपलाईन हडको परिसरातील नागरिकांना बसला आहे.

काही दिवसांपूर्वी तयार झालेला नवीन रस्ता विद्युत केबल टाकण्यासाठी जेसीबीच्या साह्याने खोदण्यात आला. त्यामुळे या प्रभागातील नगरसेवक निखिल वारे आणि बाळासाहेब पवार यांनी खड्ड्यात बसून आंदोलन सुरू केले आहे. अनेक वर्षापासून या भागात रस्ता झाला नव्हता मात्र पाठपुरावा करून निधी आणून  काही दिवसांपूर्वी हा रस्ता डांबरीकरण करण्यात आला होता आणि पुन्हा रस्ता खंदण्याचा प्रकार झाला असून या कामासाठी महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाने परवानगीही दिली असल्याची माहिती मनपा अधिकाऱ्यांनी दिली आहे.

रस्ता डांबरीकरण करण्या आधी या परिसरातील रोड खालील कामे आहेत ती महानगरपालिकेने प्राधान्याने करून घेणे गरजेचे असते मात्र रस्ता झाल्यानंतर पुन्हा खंदण्या मुळे महानगरपालिकेचा पैसा अशा प्रकारे खड्ड्यात जातोय.

हा खड्डा खोदण्यासाठी ज्या अधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे आणि ज्या ठेकेदाराने खड्डा खांदला आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी निखिल वारे यांनी केली असून जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत उठणार नसल्याची  भूमिका निखिल वारे यांनी घेतली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version