Homeराजकारणनगर शहरात चाललय काय कोण कोणत्या पक्षात कोण कुठे काहीच समजेना.. महाविकास...

नगर शहरात चाललय काय कोण कोणत्या पक्षात कोण कुठे काहीच समजेना.. महाविकास आघाडी भाजपा राबवतेय हिंदुत्वाचा अजेंडा… लोकसभा संपली अल्पसंख्यांक समजच्या मतांची गरज संपली का ?

advertisement

अहमदनगर दिनांक १ सप्टेंबर

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीची ताकद अहमदनगर जिल्ह्यात आणि नगर शहरात किती आहे हे मतदानावरून स्पष्ट लक्षात आले. महायुतीने अल्पसंख्यांक समाजाबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे लोकसभा निवडणुकीत त्यांना चांगलाच फटका बसला होता तर याचा फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना झाल्याचं मतदानावरून लक्षात आलं होतं मात्र आता महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांचेही हिंदुत्वाचे प्रेम उफाळून आले आहे. अहमदनगर शहरात महायुतीचा पराभव का झाला हे स्पष्ट झाले आहे महायुती मध्ये असलेल्या भाजपच्या काही नेत्यांनीच स्वतःच्याच पक्षाच्या उमेदवाराचे काम केले नसल्यामुळे महायुतीचा अहमदनगर दक्षिण जिल्ह्यात पराभव झाला असून अजूनही त्याचप्रमाणे भाजप मधील काही लोक वागत असल्याचं दिसून आले आहे.

महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा गुलाल ज्यावेळेस उधळला जात होता त्यावेळेस भाजपच्या माजी नगरसेवकांनी या विजयाच्या गुलालात सहभाग घेतला होता तर महायुतीत असलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या गुलालाचा आनंद घेतला होता याचा अर्थ महायुती मध्ये बिघाडी झाल्याचं दिसून आले होते. त्यानंतर अहमदनगर शहरात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामधील असलेले घटक पक्ष आणि या पक्षांचे पदाधिकारी कोण कुठे आणि कोण कोणत्या पक्षाचे आघाडीचे काम करतात हे सध्या तरी नगरकरांना कळायला तयार नाही.

अहमदनगर शहरात नुकताच एक दहीहंडीचा कार्यक्रम झाला हा दहीहंडीचा कार्यक्रम एका भाजपच्या माजी नगरसेवकाने घेतला मात्र त्यांनी पक्ष सोडला का नाही याबाबत अध्यापही काही खुलासा नाही अथवा त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना स्टेजवर बोलून महाविकास आघाडीत प्रवेश केलेला का याबाबतही कोणतीही चर्चा नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून हिंदू मुस्लिम समाजामध्ये काही कारणांमधून चांगलीच तेढ निर्माण झाली आहे काही वादग्रस्त विधाने झाल्यामुळे दोन्हीही समाजाकडून सध्या मोर्चे काढले जात आहेत. तर काही दिवसांपूर्वी नगर शहरात लव्ह जिहाद बाबत भव्य असा मोर्चा काढून मुस्लिम समाजाबद्दल अपशब्द काढले होते त्याबाबत एका महाराजांवर गुन्हा दाखल झाला होता. त्याच महाराजांना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बोलवून त्यांच्या हस्ते दहीहंडीचा कार्यक्रम ठेवला त्यामुळे आपोआपच सर्वांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले ज्या अल्पसंख्यांक समाजाबाबत अपशब्द वापरल्यामुळे गुन्हा दाखल असलेले महाराज महाविकास आघाडीला भरभरून मतदान करणारे अल्पसंख्यांक समाजाच्या बाबत कोणताही विचार न करता थेट महाराजांना बोलून त्यांनी हिंदुत्वाचा अजेंडा हातात घेतला असल्याचा दाखवून दिलं का काय असा सवालही आता समोर आला आहे. एकीकडे अहमदनगर शहराच्या नामांतराचा विषय सुरू असताना अहिल्यानगर आणि अहमदनगर याबाबतही या कार्यक्रमात चांगलीच जाहिरात बाजी करण्यात आली होती तर या कार्यक्रमात महाविकास आघाडीचे सर्वच नेते व्यासपीठावर उपस्थित होते. त्यामुळे अल्पसंख्याक समाजाबाबत त्यांनी आपल्या धोरण सोडून दिले का असाही सवाल उपस्थित राहतोय.
अल्पसंख्याक समाजाकडे फक्त मत म्हणून पाहायचं का असंच काहीच आता दिसून आले आहे. महायुती नंतर महाविकास आघाडीने हिंदुत्वाचा अजेंडा हातात घेतला का काय त्यामुळे अल्पसंख्यांक समाजाला फक्त मतदानासाठी वापरून घ्यायचं आणि नंतर सोडून द्यायचं हे धोरण सुरू झाले असेच म्हणायला हरकत नाही. आजही अहमदनगर शहरात महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ झालेल्या मोर्चामध्ये महाविकास आघाडीच्या तसेच भाजपच्या काही नेत्यांची हजेरी ही चर्चेची झालेले आहे. एकीकडे मुस्लिम समाज हा आपला असल्याचा बोललं असतानाच महाविकास आघाडीचे नेते या मोर्चाला उपस्थिती लावतात याला काय म्हणावे असा सवाल आता समोर येऊ लागला आहे. महाविकास आघाडीने सर्वधर्मसमभाव असा नारादेऊन लोकसभा निवडणुकीत विजयाचा मोठा पल्ला गाठला होता. हा पल्ला गाठण्यासाठी अल्पसंख्याक समाजाची एक गठ्ठा मते महाविकास आघाडीला पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडी अनेक ठिकाणी विजयी होऊ शकली मात्र आता लोकसभा निवडणूक संपल्यानंतर हा अजेंडा संपून पुन्हा हिंदुत्वचा अजेंडा नगर शहरात तरी महाविकास आघाडी हातात घेतेय का असं चित्र समोर दिसू लागले आहे. त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीत अल्पसंख्यांक समाज नेमका काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

मात्र सध्याच्या नगर शहरातील राजकारणावरून एक गोष्ट लक्षात येत आहे महायुतीतील घटक पक्षाने लोकसभेलाच अल्पसंख्याक समाजाला दूर केल्याचे चित्र समोर आले होते मात्र अल्पसंख्याक समाजाला फक्त मतांसाठी आपल्याबरोबर घ्यायचं आणि मतदानाचा काम झाल्यानंतर सोडून द्यायचं हे महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांकडून सध्या सुरू आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular