दिल्ली ७ मे
भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ले केले आहेत. एकाच वेळी 9 ठिकाणी हल्ला करण्यात आला आहे. बुधवारी सरकारने एका निवेदनात म्हटले आहे की, भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूर सुरू केले. ज्या अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ ठिकाणी हल्ला करण्यात आला.
निवेदनात म्हटले आहे की कोणत्याही पाकिस्तानी लष्करी आस्थापनाला लक्ष्य केले गेले नाही, दरम्यान या एअर स्ट्राईकमध्ये पाकिस्तानील बहावलपूरमध्ये 30 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे. पाकिस्तानमधील बहावलपूरमधील रुग्णालयांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील बहावलपूरमध्ये इंटरनेट बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.