Homeविशेषश्रेयाश कांकरिया यांची आयर्न मॅन स्पर्धेत सुयश श्रेयाश कांकरिया यांनी...

श्रेयाश कांकरिया यांची आयर्न मॅन स्पर्धेत सुयश श्रेयाश कांकरिया यांनी जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर मिळविले यश – आ. संग्राम जगताप

advertisement

अहमदनगर दि.१८ नोव्हेंबर –
स्पर्धेच्या युगामध्ये टिकायचे असेल तर जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर यशाचे  शिखर गाठता येत असते श्रेयास कांकरिया यांनी नुकत्याच गोवा येथे संपन्न झालेल्या आयर्न मॅन स्पर्धेमध्ये नगर शहराचे नावलौकिक मिळवले आहे. गुणवत्तेचे प्रदर्शन करत उत्कृष्ट क्रीडा कौशल्य द्वारे ही स्पर्धा पूर्ण केली आयर्न मॅन ही स्पर्धा क्रीडा क्षेत्रातील असून श्रेयस कांकरिया यांनी २ किलोमीटर स्विमिंग, ९० किलोमीटर सायकलिंग आणि २१ किलोमीटर रनिंग या क्रीडा प्रकारात उत्कृष्ट अशी कामगिरी केल्याबद्दल त्यांचा येतोचित असा सन्मान संपन्न झाला आहे या माध्यमातून श्रेयास कांकरिया यांनी नगर शहराचे नाव उज्वल केले आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
     श्रेयास कांकरिया यांची नुकत्याच झालेल्या गोवा येथे आयर्न मॅन स्पर्धेमध्ये सुयश प्राप्त केल्याबद्दल आमदार संग्राम जगताप यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अभिजीत खोसे, राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष सुमित कुलकर्णी, क्रिकेटपटू अनुप संकलेचा,शाम भाऊ खोसे आदी उपस्थित होते.
यावेळी श्रेयास कांकरिया म्हणाले की गोवा येथे आयर्न मॅन स्पर्धेमध्ये भाग घेतला होता या स्पर्धेत समुद्रामध्ये २ किलोमीटर स्विमिंग, ९० किलोमीटर सायकलिंग आणि २१ किलोमीटर रनिंग पूर्ण केली ही स्पर्धा खडतर होती इच्छाशक्तीच्या व चिकाटीच्या जोरावर मी ती पूर्ण करू शकलो या स्पर्धेच्या माध्यमातून आत्मविश्वास वाढला असून पुढच्या वेळेस पूर्ण आयर्न मॅन स्पर्धा यशस्वी करील असे ते म्हणाले.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular