Home शहर अजिंक्य युवा प्रतिष्ठाणचा दहीहंडी उत्सव जोशात साजरा अभिनेत्री प्राची देसाई आणि हजारो...

अजिंक्य युवा प्रतिष्ठाणचा दहीहंडी उत्सव जोशात साजरा अभिनेत्री प्राची देसाई आणि हजारो नगरकरांच्या उपस्थित पाच थर लावून दहीहंडी फुटली

अहमदनगर दि.२० ऑगस्ट

कोरोनाच्या संकटानंतर तब्बल दोन वर्षांनी अलेलाला दहिहंडी उत्सव शहरात विविध ठिकाणी दणक्यात साजरा करण्यात आला. कन्हैया लाल की जय, बजरंग बली की जयच्या जयघोषात मुंबई वरून आलेल्या दहीहंडी फोडणाऱ्या पथकांनी शहरातील विविध ठिकाणी उभा केलेल्या दहीहंडी फोडल्या.

या उत्सवास सिनेअभिनेत्री प्राची देसाई, चित्रांगदा सिंग, धनश्री काडगावकर यांच्या सह रील स्टार अभिनेत्रींनी हजेरी लावली होती.सावेडी उपनगर मधील गंगा उद्यान चौक परिसरात माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर यांच्या अजिंक्य युवा प्रतिष्ठानच्या वतीने भव्य दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी पाच वाजल्या पासूनच या परिसरात प्रचंड गर्दी जमा झाली होती. गणांत या ढोलपथकाने उपस्थितांची मने जिंकून घेतली होती. त्यानंतर डीजे आणि आकर्षक विद्युत रोषणाई आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री प्राची देसाई यांच्या उपस्थितीत हा दहीहंडी सोहळा उत्साहात पार पडला.

 

या ठिकाणी उभा केलेल्या दहीहंडी फोडणाऱ्या मंडळाला एक लाख 11 हजार रुपये बक्षीस जाहीर करण्यात आले होते. मुंबई येथील जय भगवान बाबा मित्र मंडळाच्या दहीहंडी पथकाने ही दहीहंडी रात्री पावणेअकराच्या सुमारास पाच थर लावून फोडली.

यंदा पोलिस प्रशासन व महापालिकेने सुमारे 15 सार्वजनिक मंडळांना दहिहंडी उत्सव साजरा करण्यासाठी परवानगी दिली होती. आमदार संग्राम जगताप यांच्या प्रेरणा प्रतिष्ठानतर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकात दहिहंडीचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी सिने अभिनेत्री चित्रागंदा सिंग हिने हजेरी लावली.

 

नालेगाव,नेप्ती नाका , कोंड्या मामा चौक,दिल्लीगेट, डाळमंडई, जय आनंद महावीर आडतेबाजार , केडगाव येथे अजित कोतकर यांच्यावतीने तर नगरसेवक संपत बारस्कर यांच्या संघर्ष प्रतिष्ठानतर्फे संघर्ष चौक येथे दहिहंडीचे आयोजन करण्यात आले होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version