Homeशहरभिंगार जवळील आलमगीर चे नाव छत्रपती संभाजी महाराजनगर..

भिंगार जवळील आलमगीर चे नाव छत्रपती संभाजी महाराजनगर..

advertisement

अहिल्या नगर दिनांक 22 फेब्रुवारी

नगर शहरातील भिंगार परिसरात असलेल्या आलमगीर या परिसराचे नाव बदलावे असे मागणी आता जोर धरू लागली असून क्रूरकर्मा औरंगजेबाच्या शेवटच्या अंघोळीच्या आठवण म्हणून या ठिकाणी एक ओटा आणि औरंगाबादचे नाव आलमगीर असल्यामुळे या नावाने हा परिसर ओळखला जातो.

आलमगीर भागाचे नाव बदलावे अशी मागणी पतीत पावन संघटनेने केली असून स्वराज्याला कायम हानी पोहोचवणाऱ्या व छत्रपती संभाजी महाराज यांचा छळ करून त्यांची निर्घुण हत्या करणाऱ्या क्रूरकर्मा औरंगजेबाचे धडगं नगर शहरानजीक असलेल्या भिंगार जवळ आहे. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याची पहिली अंघोळ तिथे घातली असल्याने आणि औरंगजेबाला आलमगीर म्हणत असल्याने या भागाला त्यावेळी आलमगीर असे नाव देण्यात आले. परंतु अशा क्रूरकर्मा औरंगजेबाचे निशाण महाराष्ट्राच्या या पवित्र भूमीत हवेतच कशाला? त्यामुळे प्रशासनाने तात्काळ नागरदेवळे परिसरातील आलमगीर भागाचे नामांतर करून छत्रपती संभाजी महाराजनगर असे करावे, अशी मानणी पतित पावन संघटनेच्यावतीने पंचायत समितीच्या गटविकास अधिक्षद्यांकडे करण्यात आली आहे. यावेळी पतीत पावन संघटनेचे अध्यक्ष गोरक्षनाथ सोनवणे, परेश घुगरे, विराज अडगटला, महादेव गाढे, अनंत मोढवे, पंकज ओहोळ, नितीन सुराणा उपस्थित होते.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular