अहमदनगर दि.२७ जून
अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक शेखर उर्फ श्रीधर देशपांडे यांनी लाच मागितल्याचा गुन्हा आज अहमदनगर येथील तोफखाना पोलीस स्टेशन येथे दाखल झालाय.आज सकाळपासूनच याबाबत मोठी चर्चा सुरू होती मात्र दुपारपर्यंत या चर्चेला कोठेच दुजोरा मिळत नव्हता दुपारी तीन नंतर अखेर शेखर देशपांडे यांनी आयुक्तांसाठी ठराविक रक्कम मागितली अशी माहिती मिळाली आणि या प्रकरणी महानगरपालिका आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्यावर गुन्हा दाखल होणार अशी माहिती मिळाल्यानंतर महानगरपालिकेसमोर येऊन भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी फटाकडे फोडले तर काही बांधकाम व्यवसायिकांनी पेढे वाटून फटाकडे वाजवले आज पर्यंतच्या इतिहासामध्ये अहमदनगर मध्ये अशी घटना प्रथमच झाली होती महानगरपालिकेत या आधी काही मोठे अधिकारी पकडले गेले होते मात्र डॉक्टर पंकज जावळे यांचे नाव आल्यानंतरच फटाकडे आणि पेढे का वाटले गेले याबाबत आता प्रश्न पडले असून एका मागासवर्गीय अधिकाऱ्यावर हा सुड तर नाही ना असा प्रश्न आता आंबेडकरी जनतेमध्ये विचारू जाऊ लागलाय.
डॉक्टर पंकज जावळे यांच्यावर झालेली ही कारवाई ही सूडबुद्धीने आणि एका मागासवर्गीय अधिकारी असल्या मुळे केली गेली असल्याची भावना आता आंबेडकरी जनतेमध्ये झाली असून सोशल मीडियावर आता याबाबत चांगलीच चर्चा होऊ लागली आहे. पेढे वाटणे आणि फटाकडे फोडणे म्हणजे समाजाचा अपमान केल्याची भावना समजा मध्ये असून याबाबत आसुरी आनंद घेणाऱ्या वृत्तीच्या लोकांवर गुन्हा दाखल करावे अशी मागणी समाजा मधील जनतेमधून होऊ लागली आहे.
डॉक्टर पंकज जावळे यांना पकडल्यानंतर सोशल मीडियावर जा फिर्यादींनी हा सापळा रचला होता त्यांचे अभिनंदन करण्याची जणू चढा ओढ लागली होती तर काही राजकीय सामाजिक व्यक्तींनी याबाबत आपले मत व्यक्त करत ही कारवाई कशी योग्य आहे हे सांगितले मात्र हा प्रकार ठराविक समाजाला टारगेट करून होत असल्याचा आरोप आता सोशल मीडियाद्वारे आंबेडकरी अनुयायी करत असून याबाबत आता जशास तसे उत्तर देणार असल्याच्या पोस्ट व्हायरल होऊ लागल्या आहेत त्यामुळे डॉक्टर पंकज जावळे यांच्या मागे संपूर्ण आंबेडकरी जनता उभा असून त्यांच्यावर कोणताही अन्याय झाल्यास ही जनता रस्त्यावर उतरून जाब विचारेल अशा अनेक पोस्ट सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत त्यामुळे ठराविक समाजाला टार्गेट करून गुन्हा नोंद झाला असल्याचा आरोप सध्या आंबेडकरी अनुयायी करत आहेत.
ज्या लोकांनी असुरी आनंद घेत फटाकडे फोडले आणि सोशल मीडियावर अभिनंदनाच्या पोस्ट टाकल्या अशा लोकांवर ठराविक समाजाला टार्गेट करून असुरी आनंद घेतला असल्याबद्दल ॲट्रॉसिटी सारखे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी सध्या सोशल मीडियातून होत आहे.