अहिल्यानगर दिनांक ७ ऑगस्ट
अहिल्यानगर शहरात रात्रीचे फिरणे म्हणजे जीवावर उदार होऊन फिरण्यासारखे आहे. नगर शहराचा असा कोणता रस्ता नाही. ज्या ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा मुक्त संचार पाहायला मिळत नाही. शेकडो भटके कुत्रे रात्रीच्या वेळेस नगर शहराच्या चौका चौकात आणि प्रत्येक रस्त्यावर पाहायला मिळतात. नगर शहरात एवढे भटके कुत्रे असतानाही रोज पाच ते सहा कुत्र्यांचा मृत्यू कशामुळे होतो हाही एक संशोधनाचा विषय आहे.

भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे अनेक जण जखमी झाले आहेत. भटके कुत्रे पकडण्यासाठी महानगरपालिकेने ठेकेदारही नेमला होता मात्र शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या कमी होताना दिसत नाही. मात्र याच कुत्र्यांच्या मृत्यू झाल्यानंतर विल्हेवाट लावण्यासाठी दरवर्षी महानगरपालिकेच्या वतीने ३६ लाख रुपये मृत कुत्र्यांची आणि जनावरांची विल्हेवाट लावणाऱ्या ठेकेदाराला दिले जाते. याबाबत आम्ही माहिती जाणून घेण्यासाठी गेलो असता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी समर्पक उत्तरे दिलेले नाहीत. आर्या एंटरप्राइजेस कंपनी नेमकी कोणाची याबाबतही महापालिका अधिकारी समर्पक उत्तर देऊ शकत नाही. महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात गेल्यानंतर मृत जनावरांची आकडेवारी घेण्यासाठी बुरुडगाव येथून आपल्याला माहिती मिळेल असे सांगितले गेले. बुरुडगाव कचरा डेपो गेल्यानंतर मयत जनावरांची माहिती महानगरपालिकेच्या गॅरेज विभागात पाहायला मिळेल असे सांगण्यात आले. यावरूनच महानगरपालिका किती गंभीरपणे याबाबत काम करते हे दिसून येत आहे. नगरवासियांचा “कर” रुपी पैसा घेऊन अशाप्रकारे ठेकेदाराच्या घशात घालण्याचे काम सध्या सुरू असून. माणसाच्या मृत्यू नंतर जेवढा खर्च अंतविधी साठी येत नाही त्या पेक्षा दुप्पट खर्च जनवारे नष्ट करण्यासाठी येतोय असेच म्हणावे लागेल.
महानगरपालिका ठेकेदाराचे लाड का करते हे समजायला तयार नाही.सध्या कचऱ्याचा प्रश्न बिकट झाला आहे.महानगरपालिकेचे माजी नगरसेवकांनी स्वखर्चातून ट्रॅक्टर लावले आहेत. मात्र महानगरपालिका अशा ठिकाणी खाजगी ट्रॅक्टर लावून कचरा उचलण्याचे प्रयोजन का करत नाही असा सवाल उपस्थित होतो आहे. सोशिक नगरकरांना या आतल्या गोष्टी माहीत नसल्यामुळे आपला पैसा कशाप्रकारे आणि कुठे जातो याची माहिती नसल्यामुळे नगरकर शांत आहेत. मात्र मृत जनावरांच्या नावाखाली लाखो रुपये उधळपट्टी कोणाच्या सांगण्यावरून महानगरपालिका करते याचे उत्तर द्यावेच लागणार आहे.