Homeशहरमहापालिकेची जागा,महापालिकेचे कर्मचारी,वाहने महापालिकेची ... मग ठेकेदाराला दर महिन्याला तीन लाख रुपये...

महापालिकेची जागा,महापालिकेचे कर्मचारी,वाहने महापालिकेची … मग ठेकेदाराला दर महिन्याला तीन लाख रुपये कशासाठी… नगरकरांनो तुमचा टॅक्सचा पैसा कुठे जातोय पहिला का?

advertisement

अहिल्यानगर दिनांक 8 ऑगस्ट

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कारभाराची अजब कहाणी. जागा महापालिकेची वापरतोय खाजगी ठेकेदार वर तीन लाख रुपये महिना. अशी स्कीम जर सर्वसामान्य नगरकरांना दिली तर तो महानगरपालिकेचे उपकार जन्मभर विसरणार नाही. महानगरपालिकेची दहा बाय दहाची जागा वापरली असेल तरी हजारो रुपये भाडे दर महिन्याला महानगरपालिका व्यावसायिकांकडून घेत असते. मात्र आर्या इंटरप्राईजेस या ठेकेदारावर महानगरपालिका एवढी मेहरबान का?आणि कोणाच्या आशीर्वादाने हा खेळ सुरू आहे हे मात्र कळायला तयार नाही.

Oplus_131072

नगरकर सुशिक्षित आणि सोशिक आहेत. दर वर्षी आपला कर (टॅक्स )इनामे इतबारे ते महानगरपालिकेकडे जमा करतात त्या बदल्यात महानगरपालिकेकडून विविध सेवा मिळाव्यात म्हणून अपेक्षा करतात. मात्र आपल्याच पैशातून म्हणजेच जनतेच्या पैशातून महानगरपालिका ठेकेदारांना पोसण्याचे काम करत आहे.

नगर शहरात मृत कुत्रे जनावरे आणि मांजरी यांची विल्हेवाट लावण्यासाठी महानगरपालिकेने आर्या एंटरप्राइजेस नामक एका कंपनीला ठेका दिला आहे. ही कंपनी फक्त मृत जनावरे नष्ट करण्याचे काम करते. मग ते मृत जनावरे नगर शहराच्या हद्दीत कुठे जरी असले तरी त्याला आणण्याची जबाबदारी महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाची आहे. घनकचरा विभागाचे कर्मचारी नगर शहरातील महानगरपालिकेच्या हद्दीतील मृत जनावारे उचलून ते थेट बुरुडगाव कचरा डेपो मध्ये य घेऊन जातात आणि त्यानंतर या जनावरांची विल्हेवाट आर्या इंटरप्राईजेस या कंपनीला दिलेल्या ठेकेदारा द्वारे लावली जाते.

म्हणजे उचलून आणण्याची जबाबदारी महानगरपालिकेची त्यासाठी वापरणारे वाहन महापालिकेचे, कर्मचारी महानगरपालिकेचे, पगार महानगरपालिकेकडून आणि फक्त विल्हेवाट लावण्यासाठी ठेकेदाराला दर महिन्याला जवळपास तीन लाख रुपये महानगरपालिका अदा करते. आणि विशेष म्हणजे ज्या ठिकाणी या कंपनीने विल्हेवाट लावण्यासाठी केंद्र उभारले आहे ती जागा सुद्धा महानगरपालिकेची असून या जागेचे भाडे महानगरपालिका आकारत नाही अशी धक्कादायक माहिती घनकचरा विभागाकडून मिळाली आहे.

त्यामुळे हा ठेकेदार कोणाचा लाडका आहे जो नगरकरांच्या कर ( टॅक्स ) रुपी पैशातून ठेकेदाराचे लाड पुरवत आहे. एकीकडे कचरा गाड्या नाहीत ठिकठिकाणी कचरा साठला गेला आहे.रोज रस्ते सफाई होत नाही या आरोग्याच्या दृष्टीने गंभीर असलेल्या समस्यांकडे माणसे आणि पगार देण्यासाठी महानगरपालिकेकडे पैसे नाहीत मात्र जनावरांची विल्हेवाट लावण्यासाठी दरवर्षी 36 लाख रुपये खर्च केले जातात हे कोणाच्या कृपा आशीर्वादाने सुरू आहे हे नगरकरांना कळलेच पाहिजे. नगरकरांच्या पैशांवर कोण डल्ला मारतोय हे सुद्धा नगरकरांसमोर येणे गरजेचे आहे. कोणाच्या आशीर्वादाने हा सर्व प्रकार सुरू आहे की जेणेकरून महानगरपालिका या शिल्लक गोष्टीला दर महिन्याला तीन लाख रुपये अदा करते.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular