अहिल्यानगर दिनांक 11 ऑगस्ट
नगर शहरात कचऱ्याचा प्रश्न बिकट होत चालला असून ठीक ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत.तर मोकाट कुत्र्यांच्या वावरामुळे रात्री शहरातून फिरणे मुश्किल झाले आहे.कुत्र्यांच्या हल्ल्यात दर महिन्याला अनेक जण जखमी होत आहेत. मात्र भटकी कुत्री कमी होताना दिसत नाही.एवढे असताना शहरी भागात रोज पाच कुत्र्यांचा मृत्यू होत आहे तर दर महिन्याला 150 कुत्रे सरासरी मरत असतील तर वर्षाला एक हजार आठशे कुत्री मयत होतील आणि महापालिकेने मध्यंतरी राबवलेल्या कुत्र्याच्या नसबंदीमुळे कुत्री जन्मप्रमाण कमी होऊन भटकी कुत्री नष्ट होणे गरजेचे होते मात्र ना कुत्री कमी होत नाहीत ना त्याचा त्रास मात्र महिन्याला याच्या नावावर किमान तीन लाख रुपये महापालिका जनतेच्या खिशातून मेलेले कुत्री नष्ट करण्यासाठी आर्य एटरप्राईजेस या कंपनीकेच्या ठेकेदाला देत आहे.

दिवसा ढवळ्या नगरकरांच्या खिशावर हा डल्ला असून जे मूलभूत प्रश्न आहेत त्यांच्या बाबत मनपा प्रशासन ठोस भूमिका घेत नाही. मात्र या ठेकेदाराचे लाड मात्र पुरवले जात आहे.विशेष म्हणजे महापालिकेची जागा त्याला भाडे नाही.महापालिकेचे कर्मचारी पगार मनपा प्रशासना कडून आणि मग ठेकेदाराला तीन लाख रुपये कशाचे दिले जातात हा प्रश्न आहे.





