अहिल्यानगर दिनांक 17 डिसेंबर
अहिल्यानगर महानगर पालिका निवडणुकीच्या प्रारूप प्रभाग रचनेत अहमदनगर कॅन्टोन्मेंट चा भूभाग दर्शवून प्रभाग रचना जाहीर केल्यानंतर मावळा प्रतिष्ठान चे अध्यक्ष निलेश म्हसे यांनी यासंदर्भात हरकत दाखल केलेली होती. परंतू जिल्हाधिकारी श्री. पंकज आशिया यांनी याची दखल न घेता प्रारूप प्रभाग रचना अंतिम मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविली होती.

यानुसार राज्य निवडणूक आयोगाने देखील सदर हरकतीची दखल न घेता अंतिम प्रभाग रचनेस मान्यता दिली. राज्य निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला म्हसे यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. यासंदर्भात १७/१२/२०२५ रोजी औरंगाबाद खंडपीठात प्राथमिक कार्यवाही होऊन सदरचे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात वर्ग करण्यात आलेले असून सदर प्रकरणाची सुनावणी दि.२२/१२/२०२५ रोजी ठेवण्यात आलेली असून सदर सूनवणी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री. चंद्रशेखर यांचे समोर होण्याची शक्यता आहे.




