HomeUncategorizedनिर्बिजीकरणात करण्यात मनमानी कारभार कुत्रे निर्बीजीकरणावर 2023 मध्ये जवळपास 68 लाख रुपयांच्या...

निर्बिजीकरणात करण्यात मनमानी कारभार कुत्रे निर्बीजीकरणावर 2023 मध्ये जवळपास 68 लाख रुपयांच्या खर्च मात्र तरीही गल्लो गल्ली पिल्लांची संख्या वाढतीच.. शहरातील खड्ड्यांच्या रस्त्यांमुळे नगरकरांचे कंबरडे मोडले मात्र कुत्र्यांच्या निर्बिजीकरणावर करोडोंचा खर्च.. निर्बिजीकरण केंद्रावर सीसीटीव्ही लावण्याची गरज

advertisement

अहमदनगर दि.१२ नोव्हेंबर

अहमदनगर शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या कमी करण्यासाठी निर्बीजीकरण करण्याचा ठेका पुणे येथील एका खाजगी संस्थेला दिला आहे. या ठेकेदार संस्थेला महानगरपालिकेच्या वतीने आज पर्यंत लाखो रुपये अदा करण्यात आले आहेत मात्र अहमदनगर शहरात अजूनही कुत्र्यांना लहान पिल्ले जन्माला येत आहेत त्यामुळे या ठेकेदार संस्थेवर संशयाचे मळभ वाढत आहे.

लाखो रुपये खर्च करूनही शहरात कुत्र्यांची पिल्ले वारंवार वाढत असल्यामुळे मग या निर्भिक्रणाचा फायदा काय भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांच्या मनात दहशत पसरली आहे. रात्री अपरात्री बाहेर वावरताना भटक्या कुत्र्यांची झुंड झुंड नगर शहरातील प्रत्येक रस्त्यावर आढळून येतात.

निर्बीजीकरण करणाऱ्या ठेकेदाराला महानगरपालिकेने भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरण करण्यासाठी करोडोंची बिले अदा केली आहेत. मात्र अहमदनगर शहरातील विकास कामांसाठी महापालिकेकडे पैसे नसल्याची ओरड नेहमीच होत असते.अनेक ठेकेदारांची बिले वर्ष वर्ष अडकून पडत असताना निर्बीजीकरण करणाऱ्या ठेकेदार संस्थेला मात्र दर महिन्याला वेळची वेळी बील अदा करण्यात आले आहेत. या बिलांची रक्कम पाहून डोळेही पांढरे होतील अशी परिस्थिती आहे. निर्बीजीकरण करणाऱ्या ठेकेदाराला 2022 ते 2023 या वर्षात जवळपास 67 लाख आठ हजार नऊशे रुपये महानगरपालिकेने अदा केले आहेत. मात्र अहमदनगर शहराच्या खड्ड्यात गेलेल्या रस्त्यांसाठी महानगरपालिकेकडे पैसे नाही अशी ओरड होते नगरकरांचे कंबरडे मोडले आहे. अनेक नागरिकांचे पैसे दवाखान्यात जात आहेत मात्र रस्ते दुरुस्त होत नाही तर भटक्या कुत्र्यांसाठी करोडो रुपयांचा खर्च होतो तरीही पिल्ले जन्माला येतात हे विशेष..

कुत्र्याच्या निर्बीजीकरण संस्थेच्या मनमानी कारभार असून ज्या ठिकाणी निर्बीजीकरण केले जाते त्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्याची गरज आहे. आणि त्याचे कनेक्शन थेट महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात अथवा सक्षम अधिकाऱ्यांच्या कार्यालयात देणे गरजेचे आहे की जेणेकरून कुत्रे निर्बीजीकरणावर लक्ष ठेवता येईल तसेच कुत्र्यांच्या निर्बीजीकरण झाल्या नंतर ठराविक खूण ही केली जाणे गरजेचे आहे त्यामुळे नेमके किती कुत्र्यांची निर्बीजीकरण केले हेही लक्षात येईल मात्र तसे होताना दिसत नसल्याने लाखो करोड रुपये नागरिकांच्या खिशातून जात आहेत. त्यामुळे महानगरपालिकेने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.तर बिल अदा करण्याच्या जी सर्वसामान्य समिती आहे त्या समितीची बैठक होते का ? झाली असेल तर कधी झाली याचाही थांगपत्ता नाही मग ही बिले अदा कोणाच्या सांगण्यावरून केली जात आहे. त्यामुळे एकंदर सर्व प्रकारचा संशय निर्माण झाला असून आता याविरुद्ध अहमदनगर शहरातील काही सामाजिक संस्था पुन्हा आवाज उठवण्याच्या तयारीत आहेत. जनतेच्या खिशातील पैसा असा वायफळ खर्च होत असेल तर नगरच्या जनतेने सुद्धा याविरुद्ध आवाज उठवणे गरजेचे आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular