अहमदनगर दि.१२ डिसेंबर –
महाराष्ट्र ही संतांची पावन भूमी आहे. अध्यात्मिक व धार्मिकतेचा मोठा वारसा आपल्या सर्वांना मिळाला आहे याचे जतन व्हावे यासाठी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करणे गरजेचे आहे.युवा पिढीला आपल्या परंपरेची व संस्कृतीची ओळख होणे गरजेचे आहे. संत संताजी जगनाडे महाराज यांचे विचार समाजाला प्रेरणादायी आहे. यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन महापौर रोहिणी ताई शेंडगे यांनी केले.
अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना महापौर रोहिणी ताई शेंडगे, अतिरिक्त आयुक्त डॉ.प्रदीप पठारे, सहाय्यक आयुक्त अशोक साबळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र संघचालक नानासाहेब जाधव, विजय काळे, हरिभाऊ डोळसे, अरविंद दारुणकर, सोमनाथ देवकर, सचिन पारखी, दत्तात्रय ढवळे, शशिकांत देवकर, राजेश देशमाने, निलेश दारुणकर, नितीन फलके, दत्तात्रय करपे, बाळकृष्ण दारुणकर, राजेंद्र म्हस्के, आदिनाथ कुऱ्हे, बंडू इवळे आदी उपस्थित होते.