HomeUncategorizedमहापालिकेने लावलेल्या खाजगी स्वच्छता कर्मचाऱ्यांना गुंडांकडून मारहाण.. गुंडांना या खाजगी कर्मचाऱ्यांना मारण्याची...

महापालिकेने लावलेल्या खाजगी स्वच्छता कर्मचाऱ्यांना गुंडांकडून मारहाण.. गुंडांना या खाजगी कर्मचाऱ्यांना मारण्याची सुपारी कोणी दिली?

advertisement

अहमदनगर दि. ३ ऑक्टोबर
सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी आणि इतर काही मागण्यांच्या बाबतीत सरकारला जाग आणण्यासाठी महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी अहमदनगर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मुंबईकडे कूच केली असून अहमदनगर महानगरपालिकेचे कर्मचाऱ्यांचे लाल वादळ हे मुंबईकडे निघाले आहे. आज दुसऱ्या दिवशी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी भाळवणी येथे मुक्काम केला होता यावेळी पारनेर नगर तालुक्याचे आमदार निलेश लंके यांनी या कर्मचाऱ्यांची भेट घेऊन महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत सरकार दरबारी आवाज उठवू आणि आपण कर्मचाऱ्यांच्या मागे उभा असल्याचं सांगितलं.

तर या संपाच्या पार्श्वभूमीवर आता अहमदनगर महानगरपालिकेचे कामकाज ठप्प झाले असून नगर शहरातील साफसफाई करण्यासाठी महानगरपालिकेने काही खाजगी कामगारांना हाताशी घेऊन शहराची स्वच्छता करण्यास सुरुवात केली असली तरी या खाजगी कामगारांना आता दमदाटी आणि मारहाण होत असल्याचा तक्रारी येऊ लागल्या आहेत कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत आणि तोफखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत काही गुंड या खाजगी कर्मचाऱ्यांना मारहाण करून काम करण्यास मज्जाव करत आहेत तसेच कचरा वाहतूक करणाऱ्या घंटा गाड्यांच्या चालकांनाही मारहाण झाल्याच्या घटना घडल्या असून आता याबाबत महानगरपालिकेने कठोर पाऊल उचलत मारहाण करणाऱ्या गुंडांवर कारवाई करण्यासाठी काही कर्मचारी पोलीस ठाण्यात ठाण मांडून आहेत.

विशेष म्हणजे ज्या गुंडांनी या खाजगी कर्मचाऱ्यांना मारहाण केली त्या गुंडांचे आणि या खाजगी कर्मचाऱ्यांची काहीही वैर नाही किंवा ते गुंड महानगरपालिकेत कामालाही नाहीत मग या गुंडांनी कोणाच्या सांगण्यावरून या खाजगी कर्मचाऱ्यांना मारहाण किंवा दमदाटी केली हा एक चर्चेचा विषय झाला आहे या गुंडांना सुपारी देणारा नेमका कोण हे आता पोलिसच शोधून काढतील.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular