Homeशहरना पालिकेची परवानगी ना पालिकेचा कर...पत्रामार्केट उभारा पैसे कमवा..पालिकेला ठेंगा...

ना पालिकेची परवानगी ना पालिकेचा कर…पत्रामार्केट उभारा पैसे कमवा..पालिकेला ठेंगा…

advertisement

अहिल्यानगर दिनांक 19 डिसेंबर

नगर शहरात सध्या एक नवीन फंडा चांगलाच जोरात सुरू आहे. मोकळ्या जागांवर पत्रा शेड उभारायच्या आणि त्या भाड्याने देऊन बक्कळ पैसा कमवायचा ना पालिकेचे परवानगी ना पालखीचा कोणताही कर दुकानाचे भाडे मात्र मालकाच्या खिशात असा फंडा नगर शहरात ठीक ठिकाणी सुरू असून महानगरपालिका या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे दिवसेंदिवस नगर शहरात पत्राचा मोठ्या प्रमाणात उभा राहत आहे.

Oplus_131072

नवीन चौक झाला की त्या ठिकाणी पत्रांचे शेड उभारण्याचे काम सध्या ठीक ठिकाणी दिसून येत आहे नगर शहरातील सावेडी उपनगरात तोफखाना पोलिस स्टेशन. समोरील लक्ष्मी मातेच्या मंदिरासमोर अचानक रात्रीतून पत्राचे शेड उभा राहिले आहे. विशेष म्हणजे या आधी या ठिकाणी पात्र्याचे टपऱ्या होत्या त्या ठिकाणी रोडवरच मंदिराच्या जवळच चिकन विक्रीचे दुकान होते.आता त्या ठिकाणी चौकात रस्त्याचे काम सुरू झाल्याने आता या पत्र्याच्या शेड वजा टपरी मंदिराच्या समोरच उभारण्यात आल्या आहेत. घरी या ठिकाणी पवित्र मंदिरासमोर चिकन मटन चे दुकान उभे राहिले तर त्यामुळे मंदिराचे पावित्र्य नष्ट होऊ शकते. तर गंगा उद्यान चौकातही पत्राचे शेड उभारून पाच ते सहा गाळे काढण्याचा प्रयत्न सुरू असून कोणतीही परवानगी नसताना अतिक्रमण करून या ठिकाणी कोणाच्या परवानगीने शेड उभा होत आहे.कारण महापालिकेच्या जागेवरच अशी शेड उभारले तर मग महापालिकेने सर्व नागरिकांना अशी परवानगी द्यावी जेणेकरून सर्वांना ठिकठिकाणी मोकळ्या जागेवर शेड वरून पैसा कमावता येईल.

नगर शहरात तब्बल 957 अनधिकृत पत्र शेडच्या दुकानांनी रस्त्यांची रुंदी गिळंकृत केली आहे. कोणताही कर न देता ही दुकानदारी सुरू आहे.पत्राशेडवाले मतदार असल्याने ते नाराज होतील, या भीतीपोटी नगरसेवक, पदाधिकांर्‍यांचे त्यांना पाठबळ आहे. त्यामुळे दुकानदारांवर कोणीही कारवाई करा असे सांगत नाही.तर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकार्‍ यांनी डोळे बंद करून घेतले असल्याचे सोंग केल्याने पत्रा चाळ अतिक्रमण जोरात सुरू आहे.

सावेडी, बोल्हेगाव, पाईप लाईन रोड, तपोवन रोड गुलमोहर रोड,मुख्य नगर शहर या भागात मोठ्या प्रमाणात पत्र शेडमध्ये दुकाने सुरू झाली आहेत. अगोदरच शहरातील रस्ते अरूंद, त्यात आता ही अनधिकृत दुकाने सुरू झाल्याने शहराच्या विद्रुपीकरणामध्ये भर पडल्याचा सूर नागरिकांमधून निघत आहेत.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular