अहिल्यानगर १३ ऑगस्ट
भटके कुत्रे कमी होण्यास तयार नाही मात्र त्यांची संख्या दिवसंदिवस वाढत चालली आहे..तीन वर्षांपूर्वी महापालिकेच्या आकडेवारी नुसार तेव्हा भटक्या कुत्र्यांची संख्या पंचवीस हजार पर्यंत होती आता ही संख्या खूप पुढे गेली असून. रस्त्यांवर कुत्र्यांचे साम्राज्य दिसून येते आहे. तर दुसरीकडे रोज पाच ते सहा कुत्रे मरत असल्याची आकडेवारी ही महानगरपालिकेची आहे. नसबंदीवर कोट्यावधी रुपये खर्च होत आहे तर मेलेल्या कुत्र्यांना नष्ट करण्यासाठी त्याचप्रमाणे करोड रुपयांचा खर्च होत असून याबाबत कोणीही बोलण्यास तयार नाही.
Oplus_131072[/caption
बुरूडगाव येथील महानगरपालिकेच्या जागेत भटकी कुत्री तसेच जे इतर जणवारे महानगरपालिकेच्या हद्दीत मरण पावतात त्यांना नष्ट करण्यासाठी खाजगी ठेकेदारा मार्फत एक यंत्रणा उभी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आर्य एटरप्राईजेस या कंपनीच्या एकाच ठेकेदाराला दरवर्षी टेंडर देण्यात येते. दर महिन्याला सरासरी तीन लाख रुपये प्रमाणे बिल अदा करण्यात येते. एवढा खर्च होऊनही महानगरपालिका हद्दीतील कुत्र्यांची परिस्थिती जैसे थे आहे. भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून त्याच रेशो ने कुत्रे मयत होत असल्याचं महानगरपालिकेच्या दप्तरी असलेल्या आकड्यांवरून लक्षात येते. मग अचानक रात्री कुत्र्यांचे भूत नगर मध्ये वावरत असतात का ?असाही प्रश्न आता नागरिकांना पडू लागला आहे.
नगरकरांच्या “कर” रुपी पैशाची अशी उधळपट्टी सुरू असून इतर आरोग्यविषयक प्रश्नांकडे महानगरपालिकेला खर्च करण्यासाठी पैसे नसतात मात्र ठेकेदाराला दरवर्षी 38 लाख रुपये देण्यासाठी पैसे कुठून उपलब्ध होतात. नागरिक महत्त्वाचे का ठेकेदार महत्त्वाचा आहे त्यामुळे मनपा प्रशासन ठेकेदारावर जास्त प्रेम करते.
कोणत्या राजकीय नेत्याचा पाठिंब्याने हा खेळ सुरू आहे की जेणेकरून महापालिका इतर प्रश्नांकडे दुर्लक्ष करून असे छोटे मोठे ठेके देऊन कोणाचे घर तर चालवत नसेल ना.





