Homeशहरअहमदनगर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी पदी पुन्हा अनिल बोरगे यांची नियुक्ती

अहमदनगर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी पदी पुन्हा अनिल बोरगे यांची नियुक्ती

advertisement

अहमदनगर दि १७ मे
अहमदनगर महानगर पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी पदी पुन्हा अनिल बोरगे यांची नियुक्ती करण्यात आली असून सध्याचे वैद्यकीय अधिकारी सतिश राजूरकर यांच्याकडे फक्त महापालिकेच्या बाळासाहेब देशपांडे दावखान्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे महापालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांच्या आदेशाने हा बदल करण्यात आला आहे.

महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे यांच्या विरोधात विविध मुद्यांवर मध्यंतरी चौकशी सुरू होती.अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे यांनी ती चौकशी केली असून, त्याचा अहवाल आयुक्तांना सादर केला होता.दरम्यान, ही चौकशी सुरू झाल्यानंतर डॉ.अनिल बोरगे यांच्याकडील सर्व जबाबदारी काढून ती डॉ.सतिश राजूरकर यांच्याकडे सोपविली होती. त्यानंतर जन्म-मृत्यू नोंद व विवाह नोंदणी ही कामे डॉ.अनिल बोरगे यांच्याकडे दिली होती.शुक्रवारी मनपा आयुक्तांनी डॉ.अनिल बोरगे यांच्या बाबतचे आदेश काढल्याने आज मंगळवारी डॉ . अनिल बोरगे आपले कामकाज सांभाळतील..

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular