अहिल्यानगर दिनांक 9 नोव्हेंबर
अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये मतदार यादीचे तयार करण्याचे काम थेट भाजपा पदाधिकारी दिल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते नितीन भूतरे यांनी केला असून याप्रकरणी भुतारे यांनी थेट राज्य निवडणुक आयुक्त यांच्याकडे तक्रार केली आहे.

मात्र या बाबतीत काही तथ्य नसून फक्त मागील विधानसभा निवडणुकीच्या जुन्या मतदार याद्यांची झेरॉक्स काढण्याचे कामे बाहेर दिले असल्याचे प्रतिक्रिया महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली आहे. नवीन येणाऱ्या मतदार यादी बाबत याचा काही संबंध नसून जुन्या मतदार यादी झेरॉक्सचे कामेच फक्त बाहेरून केली आहेत. यामध्ये कोणत्याही भाजपा पदाधिकारीचा समावेश नसल्याचे स्पष्टीकरण महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी दिले. निवडणुकीचे कामे ही पूर्णपणे पारदर्शक आणि गोपनीयता पाळून केली जात आहेत. कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असेही आवाहन त्यांनी केले आहे.





