अहमदनगर दि.१६ डिसेंबर
शनिवार दि. १७-१२-२०२२ रोजी महावितरण कंपनीमार्फत केडगाव उपकेंद्रात देखभाल दुरूस्तीच्या कामा साठी सावेडी उपकेंद्रातील पाणीपुरवठा फिडर बंद राहणार असल्याने नगर शहर परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे.
वसंत टेकडी येथील विद्युत पुरवठा खंडीत राहिल्याने
शनिवार दि. १७-१२-२०२२ रोजी अहमदनगर शहरातील मुकुंदनगर, सारसनगर, लक्ष्मीनगर, अर्बन
बँक कॉलनी, सुर्यनगर, केडगाव उपनगराचा काही भाग, शिवाजीनगर, पाईप लाईन रोड इ. भागातील
पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे.
महावितरण मार्फत वसंत टेकडी येथील विद्युत पुरवठा सुरळीत झालेनंतर उपरोक्त भागातील
पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल. तरी नागरीकांनी याची नोंद घेवून असलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे मनपाने दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हंटले