HomeUncategorizedशहरातील बकाल परिस्थितीला सत्ताधारी शिवसेना जबाबदार महापौरांनी राजीनामा द्यावा मनसेची मागणी

शहरातील बकाल परिस्थितीला सत्ताधारी शिवसेना जबाबदार महापौरांनी राजीनामा द्यावा मनसेची मागणी

advertisement

अहमदनगर दि.६ ऑगस्ट

गेल्या दोन दिवसांपासून नगर शहराला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. शहरातील काही भागामध्ये घरात पाणी शिरले आहे, वेळेवर जर पावसाआधी मे – जुन महिन्यात नालेसफाई झाली असती तर आज नागरिकांच्या घरात, दुकानात पाणी शिरले नसते, मात्र महापौर सत्तेचा आनंद घेण्यात व्यस्त आहे त्यांनी स्वतःच्या प्रभागात येणारे रस्ते, स्ट्रीट लाईट यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे अशी टीका मनसे चे शहर अध्यक्ष परेश पुरोहित यांनी केली आहे.

महापौर पद शहराचे प्रथम नागरिक म्हणून असते त्याचे भान महापौर शेंडगे यांना कदाचित नसेल. शहरातील बाजारपेठ, चितळे रोड व अन्य ठिकाणी इतके मोठमोठे खड्डे झाले आहे की, जेष्ठ नागरिकांना मणक्यांच्या त्रास सुरू झाला. पावसाचे पाणी इतके साचले की, त्याने रोगराई पसरत आहे. डेंग्यू- मलेरिया यांसारखे आजार सुरु झाले. ऑगस्ट महिना सुरु झाला, हिंदू धर्माचे सण चालु होत आहे त्याआधी औषध फवारणी झाली पाहिजे होती.महापौर शेंडगे हे स्वतःच्या कुटूंबातील व्यक्तीना मोठे करण्यात व्यस्त असून त्यांचे नगर शहराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे, त्यांनी नैतिकता दाखवून स्वतः महापौर पदाचा राजीनामा द्यावा आशा मागणीचे पत्रक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष परेश पुरोहित यांनी काढले आहे.

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular

01:21