HomeUncategorizedअमीर मळा जाळीत कांड प्रकरण ; त्या दिवशी घडलेला प्रकार सीसी टीव्ही...

अमीर मळा जाळीत कांड प्रकरण ; त्या दिवशी घडलेला प्रकार सीसी टीव्ही मध्ये कैद पोलिसांनी तपास करून न्याय द्यावा गुलाब पठाण यांच्यासह इतर लोकांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालया समोर आत्मदहनाचा इशारा पठाण कुटुंबियांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट

advertisement

अहमदनगर दि.७ सप्टेंबर –

नगर औरंगबाद रोड वरील अमीर मळा येथे 30 ऑगस्ट रोजी जागेच्या वादावरून बशीरखान पठाण यांचा जाळून दुसऱ्या दिवशी उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता.या प्रकरणी गुलाब अयुबखान पठाण यांच्यासह त्यांच्या इतर लोकांवर भादवि ३०७,३२४,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात आता गुलाब पठाण यांच्या पत्नीने जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन झालेला प्रकार हा खोटा असून आपल्या पतीवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. मयत बशीर खान पठाण यांच्याबरोबर अनेक दिवसांपासून जमिनीचे वाद सुरू आहेत. मात्र ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशीचे सर्व सीसी टीव्हीही फूटेज तपासून या प्रकरणात खरा अपराधी कोण याबाबत चौकशी करण्याचे मागणी करण्यात आली आहे. त्या दिवशी घडलेल्या सर्व घटनांचे सीसीटीव्ही फुटेज त्यांनी पोलिसांना दिले असून हे सर्व सीसी टीव्ही फूटेज तपासून खोटे दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावे अशी मागणी गुलाब पठाण यांच्या पत्नीने केली आहे .

पहा त्या दिवशीचा सीसी टीव्ही

आम्ही कोणीही बशीर खान पठाण यांना जाळण्याचा प्रयत्न अथवा मारण्याचा प्रयत्न केला नसून सीसीटीव्ही मध्ये हा सर्व प्रकार स्पष्ट दिसत आहे. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा गुलाब पठाण हे त्यांच्या मित्राच्या दुकानात असल्याचं दुकानातील सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून येत आहे. तसेच बशीर खान पठाण यांनी स्वतःलाच पेटून घेऊन नंतर ही आग जेव्हा भडकली तेव्हा गुलाब पठाण यांच्या भावाने तसेच वडिलांनी बशीर खान यांना वीजवण्याचा प्रयत्न केला दवखण्यात उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी मदत केली  ही घटना सीसीटीव्ही फुटेज मध्ये चित्रित झाल्याचं शहनाज गुलाब पठाण यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केलं आहे.

या प्रकरणी आमच्या कुटुंबातील व्यक्तींना विनाकारण आरोपी करून त्यांच्या विरुद्ध खोटी फिर्याद दिली असल्याने फिर्याद रद्द करण्यात यावी.खऱ्या आरोपींना उघडे करून त्यांचे विरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. माझे पती,दिर व सासरे यांचेवर खोटा गुन्हा दाखल झाल्याने व त्यांना अनोळखी गुंडाकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याने भयभीत होऊन ते कोठेतरी निघून गेले आहेत. त्यामुळे आमचे कुटुंबाचा उदरनिर्वाह त्यांच्यावरच असल्याने लहान सहान मुलाबाळांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आम्हाला लवकरात लवकर न्याय न मिळाल्यास मी लहान मुलांसह पोलीस स्टेशन येथे किंवा पोलीस अधीक्षक कार्यालया समोर पूर्व कल्पनेशिवाय आत्मदहन करणार आहोत निवेदनात देण्यात आले आहे. या वेळी अज्जूबी पठाण,शहनाज गुलाब पठाण, सना असिफ पठाण, असिम राजु रफिक शेख,आदम अहमद शेख,शौकत निजाम शेख,दिलावर अब्दुल शेख,फैयाज रशीद शेख उपस्थित होते.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular