Homeशहरशनिवार रविवार सोमवार पाण्याच्या वेळेत बदल मनपा पाणीपुरवठा विभागाची माहिती

शनिवार रविवार सोमवार पाण्याच्या वेळेत बदल मनपा पाणीपुरवठा विभागाची माहिती

advertisement

अहमदनगर दि.१७ ऑगस्ट

अहमदनगर दि. १८ शनिवार दि.२०-८-२०२२ रोजी महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण कंपनीकडून १३२ के.व्ही. एम. आय. डी. सी. उपकेंद्र पारेषणमध्ये तांत्रिक कामासाठी व देखभाल दुरुस्तीसाठी ३३ के.व्ही. मुळा डॅम विदयुत वाहिनीवर सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यत शट डाउन घेण्यात येणार आहे. सदर काळात अहमदनगर शहर पाणीपुरवठा योजनेवरील मुळानगर, विळद पंपींग स्टेशन येथून होणारा पाण्याचा उपसा बंद राहणार असल्याने शहर पाणी वितरणासाठीच्या टाक्या भरता येणार नाही.

त्यामुळे शनिवार दि. २०-८-२०२२ रोजी बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगरातील गुलमोहर
रोड पाईपलाईन रोड, लक्ष्मीनगर, सुर्यनगर, निर्मलनगर, मुकुंदनगर तसेच स्टेशन रोड, सारसनगर,
विनायकनगर, मुकुंदनगर, केडगाव, नगर-कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसर इ. भागास
[सकाळी १०.०० नंतरच्या पाणी वाटपाच्या भागास] पाणीपुरवठा होउ शकणार नाही.

तसेच रविवार दि. २१-८-२०२२ रोजी रोटेशननुसार पाणी वाटपाच्या शहराच्या भागास म्हणजेच मंगलगेट, झेंडीगेट, दाळमंडई, रामचंद्र खुंट, काळू बागवान गल्ली, धरती चौक, माळीवाड, कोठी, कलेक्टर कचेरी परिसर या भागात व गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हाडको, प्रेमदान हाडको, टिव्ही सेंटर हाडको, लॉईड बिशप कॉलनी इत्यादी परिसरात महानगरपालिकेमार्फत पाणीपुरवठा करण्यात येणार नाही, या भागातील पाणीपुरवठा हा रविवार ऐवजी सोमवार दिनांक २२-८-२०२२ रोजी करण्यात येईल.

तसेच सोमवार दि. २२-८-२०२२ रोजी पाणीपुरवठा होवू घातलेल्या शहराच्या मध्यवर्ती भागास उदा. सर्जेपुरा, तोफखाना, सिध्दार्थनगर, लालटाकी, दिल्लीगेट, नालेगाव, चितळे रोड, ख्रिस्त गल्ली, आनंदी बाजार, कापडबाजार, माळीवाडा, बालिकाश्रम रोड परिसर व सावेडी परिसर इत्यादी भागात पाणीपुरवठा होणार नसून तो मंगळवार दि. २३-८-२०२२ रोजी करण्यात येईल.


शहरातील पाणीपुरवठा एक दिवस बंद करून उपनगरात ज्या भागात जास्त दिवसाचे रोटेशन आलेले अशा भागात पाणीपुरवठा करण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे. तरी नागरीकांनी याची नोंद घेवून असलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे मनपाने दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हंटले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular