अहमदनगर दि.१९ मे
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याविरोधात राळेगणसिद्धीमध्ये आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. महागाईत जनता होरपळत असताना अण्णा हजारे शांत कसे असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
आंदोलन, उपोषणाच्या माध्यमातून सरकारला जनतेच्या प्रश्नावर जाब विचारणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. राळेगणसिद्धी येथेच अण्णा हजारेंविरोधात आंदोलन करणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ काशिद यांनी दिला आहे. झोपी गेलेल्या अण्णा हजारे यांना उठवण्यासाठी 1 जून रोजी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले.