अहमदनगर दि.१४ ऑक्टोबर
बनावट NOC मधील आरोपी रोहन धेंडवाल याने ज्या लॅपटॉपचा वापर केला होता तो लॅपटॉप त्याने नष्ट केला असल्याचा तपासात उघड झाले असून त्यामुळे आता पोलिसांनी रोहन देंडवाल याच्या विरोधात पुरावा नष्ट
केल्याप्रकरणी भादंवि कलम २०१ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
तर या प्रकरणात आर्मी हेड क्वॉटरमध्ये आवक-जावकचे काम पाहणारा सेवानिवृत्त लिपिक विनय दत्तात्रय वराडे याला अटक करण्यात आलेली आहे. तो कामावर असतानाचे दप्तर तपासायचे असल्याने पोलिसांनी लष्कराला परवानगी मागितली आहे.
गुरुवारी रोहन धेंडवाल याला न्यायालयात हजर
केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.बनावट NOC प्रकरणात रोहन धेंडवाल हा मास्टर माईंड असल्याचे तपासात समोर आले आहे.