Homeक्राईमबनावट NOC प्रकरणी अटक असलेल्या राजा ठाकूर विरोधात भिंगार मध्ये फसवणुकीचा आणखी...

बनावट NOC प्रकरणी अटक असलेल्या राजा ठाकूर विरोधात भिंगार मध्ये फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल

advertisement

अहमदनगर दि.७ ऑक्टोबर

बनावट एनओसी प्रकरणात कोतवाली पोलिसांच्या ताब्यात असणारा राजा ठाकूर याच्या अडचणीत वाढ झाली असून त्याच्यावर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अजून एक गुन्हा दाखल झाला आहे. राजा ठाकूर याने सैन्यदलात सफाई कामगाराची नोकरी लावण्याच्या अमिषाने एका व्यक्तीची ११ लाखाची फसवणूक केली आहे. याबाबत विक्रम विजय छजलानी (वय ३९, रा. हरी मळा, सोलापूर रोड, भिंगार) यांनी फिर्याद दिली आहे .

माझी पत्नी ब्रिगेडीयर यांची स्वीय सहाय्यक असल्यामुळे माझे सैन्यदलात उच्च अधिकारी परिचित आहेत. आतापर्यंत मी अनेक लोकांची नोकरीची कामे करून दिलेली आहेत. तुमच्या पत्नीला नोकरीला लावण्यासाठी अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतील असे सांगून विक्रम छजलानी यांच्या पत्नीला भारतीय सैन्यदलात सफाई कामगार म्हणून नोकरीला लावतो म्हणून विक्रम छाजलानी यांच्याकडून सहा लाख रूपये २०१८ मध्ये घेतले होते. तर उर्वरित पाच लाख रुपये देण्यासाठी छजलानी यांनी पतसंस्थेत दागिने गहाण ठेवून सोनेतारण कर्ज घेतले आणि छजलानी यांनी राजा ठाकूर याच्या बँक खात्यात १५ सप्टेंबर २०२० रोजी आरटीजीएसद्वारे रक्कम पाठवली.

त्यानंतर नोकरी कधी मिळेल याची वेळोवेळी विचारणा केली असता राजा ठाकूर याने छजलानी यांना उडवाउडवीची उत्तरे द्यायला सुरूवात केली. तसेच फिर्यादीला शिवीगाळ,दमदाटी करत तुझ्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करेल, तुझ्या मुलाबाळांना जीवे ठार मारेल, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

राजा ठाकूर सध्या बनावट एनओसी प्रकरणात कोतवाली पोलिसांच्या ताब्यात असून हा तपास पूर्ण झाल्यानंतर भिंगार पोलीस राजा ठाकूर याला न्यायालयामार्फत ताब्यात घेतील. राजा ठाकूर याने नोकरीचे आमिष दाखवून अजून कोणाला फसवले आहे का याबाबत तपास करणार आहेत

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular