Homeक्राईमलष्कराची बनावट एनओसी प्रकरण राजा ठाकूर चा साथीदार रोहन धेंडवाल पोलिसांच्या ताब्यात

लष्कराची बनावट एनओसी प्रकरण राजा ठाकूर चा साथीदार रोहन धेंडवाल पोलिसांच्या ताब्यात

advertisement

अहमदनगर दि.६ ऑक्टोबर

अहमदनगर शहराच्या हद्दीवर असणाऱ्या भिंगार परिसरातील आर्मी स्टेशन हेडक्वार्टरकडून एनओसी घेतल्याशिवाय लष्करी हद्दीच्या जवळपास असणाऱ्या इमारतींना बांधकाम करता येत नाही मात्र थेट आर्मी हेडक्वार्टर मधून बनावट एन ओ सी बाहेर पडली असून आता हे संपूर्ण प्रकरण उजेडात आले आहे. याबाबत अहमदनगरच्या उपविभागीय खात्याकडून कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास सध्या सुरू असून या प्रकरणात अटकेत असलेल्या राजा ठाकूर याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला ७ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे तपासा दरम्यान राजा ठाकूर याच्याकडून पोलिसांना या प्रकरणाबाबत भरपूर माहिती मिळत असून या प्रकरणात त्याला मदत करणारा रोहन धेंडवाल याला पोलिसांनी अटक केली आहे.


यामध्ये नमूद करण्याची बाब म्हणजे नगर हेडक्वार्टरकडून २०१६ पासून आज पर्यंत सहा वर्षात एकही एनओसी देण्यात आली नसल्याचे खुलासा केला आहे.

राजा ठाकूर नंतर आता रोहन धेंडवाल याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणात अजून कोणा कोणाचा सहभाग आहे याची माहिती पोलिसांना मिळणार असून या गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे. कारण थेट संरक्षण विभागालाच फसवण्याचा हा प्रकार असून 2016 पासून सहा वर्षात एकही एनओसी नगर हेडकोर्टर कडून देण्यात आली नव्हती मग जे बांधकाम झाले ते कोणाच्या परवानगी झाले याबाबत आता पोलिस तपास होणार आहे रोहन धेंडवाल याला पोलीस उद्या न्यायालयात हजर करणार आहेत.

या घटनेचा तपास पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गजेंद्र इंगळे, अभय कदम,सलीम शेख,
सुमीत गवळी, बंडू भागवत, रवींद्र टकले, अतुल काजळे, दीपक बोरूडे, करत आहेत.

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular