Homeविशेषआरोग्यमित्र बनले वृक्षमित्र... गर्भगिरी महादेव डोंगरावर केले वृक्षारोपण.

आरोग्यमित्र बनले वृक्षमित्र… गर्भगिरी महादेव डोंगरावर केले वृक्षारोपण.

advertisement

अहमदनगर दि.६ जुलै
अहमदनगर जिल्ह्यात महात्मा ज्योतिराव फुले व आयुष्यमान भारत जनआरोग्य योजनेअंतर्गत जनतेची सेवा करणारे आरोग्यसेवक वर्षभर सामाजिक उपक्रमही राबवत असतात. महात्मा फुले जनआरोग्य योजनेला दहा वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने महात्मा ज्योतिराव फुले व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे जिल्हा प्रमुख डॉ मयूर मुथ्था यांच्या नेतृत्वाखाली सर्व आरोग्यसेवकांनी वृक्षरोपणा सारखा उपक्रम राबवला.

अहमदनगरच्या चांदबीबी महाल परिसरातील गर्भगिरी महादेव येथे वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावण्यात आली. झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारत वेळोवेळी या परिसरात जाऊन पाहणी केली जाईल असं मत मयूर मुथा यांनी व्यक्त केले. सध्या पावसाचे दिवस आहेत, त्यामुळे लावलेली झाडे उगवून येतील याची खात्री आहे. जनतेने सार्वजनिक ठिकाणी फिरताना झाडांची काळजी घेतली पाहिजे तसेच पर्यावरणाची हानी होऊ नये यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे असेही ते म्हणाले. योजनाला दहा वर्षे पूर्ण झाल्याबद्दल हा अनोखा उपक्रम राबवल्याबद्दल सर्व आरोग्य मित्रांचे कौतुक होत आहे.

यावेळी दक्षता अधिकारी विठ्ठल वांढेकर ,आरोग्यमित्र राहुल उकिर्डे, हर्षवर्धन साळवे, सुनील राहिंज, तुषार वाघमारे, अन्सारअली सय्यद, शरद कोंडा, नेहा वराडे, प्रियंका चव्हाण, शिल्पा तेलंगूर हे उपस्थित होते.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular