Homeराज्यसहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांना राष्ट्रपतींचे सरहानीय सेवा मेडल प्रदान

सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांना राष्ट्रपतींचे सरहानीय सेवा मेडल प्रदान

advertisement

मुंबई दि.१४ ऑक्टोबर

पोलीस दलात १९९२ साली एमपीएससी मार्फत पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत झालेले अशोक लालसिंग राजपूत यांना राज्यपाल श्री भगतसिंग कोशियारी यांच्या हस्ते सरहानिय सेवा मेडल प्रदान करण्यात आले आहे.

अशोक राजपूत यांची कामाची सुरुवात नागपूर येथे झाली. त्यानंतर औरंगाबाद पोलीस आयुक्तालय,अँटी करप्शन विभागा औरंगाबाद, अहमदनगर जिल्हा मध्ये एमआयडीसी व राहुरी पोलीस स्टेशन तसेच स्थानिक गुन्हे शाखा प्रभारी अधिकारी म्हणून सात वर्षे काम पाहिले. सीआयडी विभाग औरंगाबाद, त्यानंतर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात गुन्हे शाखा, नेरूळ पोलीस स्टेशन, पनवेल तालुका पोलीस स्टेशन, येथे काम केले, त्यानंतर चाकण पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड या ठिकाणी कर्तव्य बजावले.

अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या गुन्हेगार टोळ्या, अमली पदार्थ विकणारे गुन्हेगार टोळ्या, दरोडा अवैद्य शास्त्र विक्री करणाऱ्या टोळ्यायांना जेरबंद करून बरेच गुन्हे त्यांच्याकडून उघडकीस आणण्यात त्यांना यश आले होते. जबरी चोरी घरफोडी, वाहन चोरी, धूम स्टाईल मंगळसुत्र चोर, दरोडा करणाऱ्या टोळ्या जेरबंद केल्या व त्यांच्याकडून अनेक गुन्हे उघडकिस आणून न्यायालयात बऱ्याच गुन्ह्यांमध्ये आरोपींना सजा झालेली आहे.

२००८ मध्ये पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नती झाल्या नंतर डिसेंबर 2021 मध्ये पोलीस उपाधीक्षक/ सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून पदोन्नती झाली होती सध्या अशोक राजपूत हे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून गुन्हे शाखा ठाणे शहर येथे नेमणुकीस आहेत. त्यांनी आतापर्यंत केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे त्यांना वरिष्ठांकडून ७०० बक्षिसे व १४० प्रशंसापत्र प्राप्त झालेले आहे. त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन माननीय राष्ट्रपती भारत सरकार यांच्यामार्फत राष्ट्रपतींचे “*सरहानिय सेवा मेडल* ” घोषित करण्यात आले सदर मेडल अशोक राजपूत यांना १३ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्या हस्ते तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्य पोलीस महासंचालक रजनीश सेठ, संजय कुमार पोलीस महासंचालक प्रशिक्षण व महाराष्ट्र राज्यातील भारतीय पोलीस सेवेतील इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत राजभवन मुंबई येथे प्रदान करण्यात आला.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular