अहमदनगर दि.१० नोव्हेंबर (सुशील थोरात)
बास्केटबॉल 2022 चा मेगा लिलाव अहमदनगर मध्ये नुकताच पार पडला सुरू आहे. आठ बोली लावणाऱ्या फ्रँचायझींनी 96 खेळाडूंना खरेदी केले आहे. त्यापैकी आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू आशिष रेणापूरकर आहे, ज्याला टायटन्स संघाने आठ लाखाला विकत घेतले आहे.आशिष रेणापूरकर बोली लावण्यासाठी सर्वच
संघामध्ये 10 मिनिटांची शर्यत सुरु होती.
अहमदनगर शहरात येत्या १८ नोव्हेंबर पासून बास्केटबॉल चॅम्पियन्स लीग 2022 सुरू होणार असून या स्पर्धेसाठी राष्ट्रीय राज्यस्तरीय खेळाडू सहभागी होणार आहे अहमदनगर शहरामध्ये प्रथमच लीलाव पद्धतीने या खेळाडूंची विविध संघांनी खरेदी केली आहे. अहमदनगर शहरामध्ये या आधी प्रोफेसर कॉलनी चौकातील जॉगिंग ट्रॅक वर बस्केटबॉल स्पर्धा झाली होती त्यानंतर पुन्हा आता ही बास्केटबॉल चॅम्पियन लीग होणार आहे. त्यासाठी बुधवारी रात्री खेळाडूंचा लिलाव करण्यात आला यासाठी अनेक चांगल्या खेळाडूंना मोठमोठी बोली लावण्यात आली होती. अहमदनगर शहरात प्रथमच बास्केटबॉल साठी असा लिलाव पार पडला या लीगमध्ये एकूण आठ संघ सहभागी होणार असून 18 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर या तीन दिवसाच्या दरम्यान बास्केटबॉलचा थरार नगरकरांना पाहायला मिळणार आहे.20 तारखेला सायंकाळी अंतिम सामना होईल या स्पर्धेत राष्ट्रीय खेळाडू आपल्या खेळाची चमक दाखवतील.
असे आहेत संघ :– ग्रीन यार्ड टर्फ, मालक :- करण कराळे, संदीप आडोळे, अभिजीत म्हस्के, रवी वाकळे संघाचा कर्णधार :- आशिष बोराडे
तन्वर योद्धा :- मालक :- डॉ. हर्षवर्धन तंवर कॅप्टन :- राजेंद्र सिंग,तन्वर टायटन्स मालक :- वेदपाल तन्वर कर्णधार :- कार्तिक मिश्रा, बॉलर्स मालक :- विराज भंडारे कॅप्टन :- हर्षल शेलोत, स्पार्टन्स मालक :- दीपक फुंडे, राहुल ठोकळ कर्णधार :- लोकेंद्र सिंग,जग्वार्स मालक :- अभिजीत जाधव कॅप्टन :- कपिल गायकवाड,केसरी वाघ मालक :- सुमित कुलकर्णी कॅप्टन :- शाम राम रणधीर,जेडी हूपर्स मालक :- मानव वाधवा कर्णधार :- तुषार वाकोडे
ही लीग अहमदनगर शहरातील सावेडी उपनगर मधील प्रोफेसर कॉलनी जवळील जॉगिंग ट्रॅक बास्केटबॉल कोर्ट वर रंगणार असून या लीगचे आयोजक माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर, गिरीश जगताप, विशाल ठोकळ, विजय शिनगारे, सचिन भापकर हे आहेत.