Homeशहरक्रूरकर्मा औरंगजेबाचे पोस्टर नगर मध्ये झळकू शकतात तर मग लॉरेन्स बिश्नोईचे ...

क्रूरकर्मा औरंगजेबाचे पोस्टर नगर मध्ये झळकू शकतात तर मग लॉरेन्स बिश्नोईचे का नाही ?

advertisement

अहिल्यानगर दिनांक 20 फेब्रुवारी

नगर शहरातील फकीरवाडा परिसरात हजरत दंबाहरी हजरत यांच्या उरूसानिमित्त मुकुंदनगर भागातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत काही जणांनी औरंगजेबाचे फोटो झळकावत आक्षेपार्ह घोषणाबाजी केली होती या घटनेला अद्याप वर्षही उलटले नाही मात्र आता नगर शहरात दोन दिवसापूर्वी झालेल्या शिवजयंती मिरवणुकीमध्ये गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि नथुराम गोडसे यांचे पोस्टर मिरवणुकीमध्ये झळकले आणि यावरून एकच कल्लोळ उडाला आहे.

जर संपूर्ण हिंदुस्तान चा सर्वनाश करून मुघल सत्ता आणण्याचा मानस धरून संपूर्ण हिंदुस्तानात हिंदूंची मंदिरे आणि हिंदूंची कत्तल करणाऱ्या तसेच महाराष्ट्राचे स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांना मारण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या तसेच स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांना छळ करून चाळीस दिवस अतोनात यातना देऊन मारणाऱ्या क्रूरकर्मा असलेल्या औरंगजेबाचे फोटो नगर शहरात एका धार्मिक कार्यक्रमात झळकले जातात आणि त्याचे उदत्तीकरण करण्याचा प्रयत्न केला जातो. जो औरंगजेब स्वतःच्या वडिलांचा भावाचा, बहिणीचा आणि मुलांचा होऊ शकला नाही त्या औरंग्याबद्दल नगर शहरात प्रेम उत्पन्न होऊन त्याचे फोटो झळकले जातात अशा क्रूरकर्माच्या आठवणींना जतन केले जाते तेव्हा समाजातील सो कोल्ड सामाजिक कार्यकर्ते झोपलेले असतात का ? असा प्रश्नही उपस्थित होतोय.

ज्यावेळेस औरंगाबाचे फोटो झळकले त्यावेळेस हे सर्व बिळात लपले होते मात्र आता लॉरेन्स बिश्नोई आणि नथुराम गोडसे यांचे फोटो झळकताच सोशल मीडियावर जणू काय कल्लोळ उठवण्याचे काम या बीळात लपलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी सुरू केले आहे. त्यामुळे क्रूर कर्मा औरंगजेबाच्या बाबत तुमची भूमिका काय हे सर्वप्रथम ठरवून मग नथुराम गोडसे आणि लॉरेन्स बिश्नोईबाबत चर्चा करा अन्यथा तुम्ही औरंगजेबाचे समर्थन करताय का असे वाटू लागेल.

छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य संपूर्ण हिंदुस्तान मध्ये होते दिल्लीच्या तक्ताला झुकवणारा पहिला राजा हा छत्रपती शिवाजी महाराज होते मात्र इतिहासामध्ये जेव्हा दक्षिण भारतावर छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांना पराभूत करण्यासाठी आणि तो भाग आपल्याकडे घेण्यासाठी आक्रमण केले तेव्हा हजारो मंदिरे उध्वस्त केली गेली त्याची साक्ष अजूनही अनेक मंदिर देत आहेत मात्र याच महाराष्ट्रात क्रूर कर्मा असलेल्या औरंगजेब च्या नावाने म्हणजेच आलमगीर या नावाने अनेक ठिकाणी वसाहती आणि त्याच्या विचारांचे जतन केले जाते हे निश्चितच वेदनादायक आहे.

अफजलखानाचा कोथळा काढला हा एक इतिहास आहे आणि अफजल खान हा छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्यासाठी भर दरबारात विडा घेऊन महाराष्ट्रात आला होता याच अफजलखानाचा कोथळा छत्रपती शिवाजी महाराजांनी काढला हा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याच्यावर निघालेल्या पोस्टवरून दंगल होते म्हणजेच कुठेतरी काहीजण अजूनही औरंगजेबाचा विचार पाळून आहात असंच म्हणायला हरकत नाही. त्यामुळे औरंगजेब हा संपूर्ण हिंदुस्थानाचा शत्रू होता आणि तो कायमस्वरूपी राहील आणि इतिहास नेहमीच या क्रूर विचारला कधीच माफ करणार नाही.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular