Homeशहरबाबा बंगाल अतिक्रमण दगडफेकी प्रकरणात ट्विस्ट उच्च न्यायालयाचे जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे...

बाबा बंगाल अतिक्रमण दगडफेकी प्रकरणात ट्विस्ट उच्च न्यायालयाचे जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश असतानाही कारवाई कोणत्या अधिकारात पोलीस बंदोबस्त न घेण्याचे कारण काय ट्रस्ट ची संबंध नसणाऱ्या त्या नागरिकाच्या अर्जवरून कारवाई कशी? ट्रस्टी आता त्या अधिकाऱ्यविरोधात कायदेशीर लढाईच्या तयारीत

advertisement

अहमदनगर दि.१५ जुलै

अहमदनगर महानगर पालिकेच्या अतिक्रमण पथकावर 12 जुलै रोजी नगर शहरातील झेंडीगेट भागातील बाबा बंगाल दर्गा शेजारी असलेल्या अतिक्रमण काढायला गेलेल्या पथकावर दगडफेक झाल्याची घटना घडली होती मात्र आता या प्रकरणात चांगला ट्विस्ट आला असून महानगरपालिकेचे अधिकारीच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहताना दिसून येत आहे.

झेंडीगेट येथील राजु शेख यांच्या तक्रार अर्जावरून अहमदनगर शहरातील बाबा बंगाल हिंदुस्थान गॅरेज शेजारील पत्र्याचे अतिक्रमीत झालेल्या शेडची पाहणी करून ते पाडण्यासाठी जेसीबी घेवुन अतिक्रमण पथक गेले त्यावर काही लोकांनी दगडफेक केली अशी फिर्याद महानगरपालिकेचे प्रभाग समितीचे प्रभाग अधिकारी मेहेर लहारे यांनी कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये दिली आहे. याप्रकरणी जवळपास नऊ लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

मात्र महानगरपालिकेचे पथक जे अतिक्रमण पाडायला गेली होती ती जागा बाबा बंगाल दर्गा मस्जिद कब्रस्तान पब्लिक ट्रस्ट यांच्या मालकीची असून त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये न्यायालयीन लढाई सुरू असून याबाबतचे पत्र तसेच न्यायालयाचे ऑर्डर ट्रस्टच्या वतीने महानगरपालिकेला एक जुलै 2022 रोजी देण्यात आले होते या जागे बाबत सर्वोच्च न्यायालयाने जैसे थे चे आदेश दिले आहेत बाबा बंगाली दर्गा ट्रस्ट सर्वे नंबर 64 जीएसआर 716 ही मिळकत 2.76 ही जागा बाबा बंगाली दर्गा आणि मज्जिद यांची मिळकत आहे सदर जागेचा सर्वोच्च न्यायालयात दावा चालू असून त्याचा नंबर एस एल पी 31 36 असा आहे हा दावा सर्वोच्च न्यायालयात चालू आहे त्या दाव्या मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या जागेला स्टेटस को दिलेला आहे. म्हणजेच सदर जागेची परिस्थिती जशी आहे तशी ठेवण्याबाबत आदेश दिला आहे म्हणून सदर जागेचा फिगर चा फेरफार किंवा बदल करू शकता येत नाही सदर जागा पडझडच्या परिस्थितीत असली तरी आपण सर्वोच्च आदेशाच्या उल्लंघन किंवा अपमान करू शकत नाही असे पत्र ट्रस्टच्या वतीने अब्दुल गफार अब्दुल कादर, शेख आरिफ अब्दुल रज्जाक, शेख सादिक बाबुलाल यांनी महानगरपालिका दिले होते

ज्या राजू शेख नामक व्यक्तीने तक्रार अर्ज दिला होता त्याचा आणि ट्रस्ट चा कोणताही संबंध नाही तसेच याआधी सुद्धा अतिक्रमण पथक या ठिकाणी कारवाईसाठी आले होते मात्र तेव्हा सुद्धा सर्वोच्च न्यायालयिन आदेशाबाबत त्यांना सांगितल्यानंतर हे पथक तिथून निघून गेले होते मग पुन्हा त्याच अर्जावर मात्र सर्वोच्च न्यायालयाचा आदेश दाखवून आणि ट्रस्टच्या अध्यक्ष आणि ट्रस्टींनी महानगरपालिकेला निवेदन देऊनही नेमका कोणाच्या आदेशाने आणि पोलीस संरक्षणा विना ही अतिक्रमण पडण्याची घाई कोणाला झाली होती तसेच अतिक्रमण विभागातील कोणताही वरिष्ठ अधिकारी या मोहिमेदरम्यान उपस्थित नव्हता तसेच जेव्हा सुरुवातीला त्या ठिकाणी शाब्दीक वाद सुरू झाला तेव्हा कोणत्याही कर्मचाऱ्याने अधिकाऱ्यांना अथवा पोलिसांना फोन का लावला नाही तसेच वादग्रस्त अतिक्रमण पडायला जाताना पोलीस बंदोबस्त घेऊन न जाता अधिकारी मुख्य कार्यालयात मिटिंग मध्ये व्यस्त कसे राहतात आणि ज्या अधिकाऱ्यांने फिर्याद दाखल केली त्याला दगडफेक करणाऱ्यांची संपूर्ण नावे घरच्या पत्त्यासह तोंड पाठ कासेकाय असे अनेक प्रश्न आता बाबा बंगाल दर्गा मज्जिद कबरतान पब्लिक ट्रस्टच्या सदस्यांनी उभे केले आहेत.

सर्वोच्च न्यायालयचा अवमान केला म्हणून आता ट्रस्टच्या वतीने महानगरपालिकेच्या त्या अधिकाऱ्याबाबत सर्वोच्च न्यायालयात कागदपत्रे सादर करण्यात आले आहेत. ट्रस्टच्या ट्रस्टींवर गुन्हे दाखल झाले आहेत ते अन्यकारक असून व्हिडिओ काही सेकंदात कशाप्रकारे व्हायरल झाला आणि कोणी व्हायरल केला तसेच व्हिडिओ एका बाजूनेच व्हायरल केला गेला ट्रस्टचे लोक भिंत पाडू नका हे सांगत असताना अचानक कोणी दगडफेक केली आणि त्यानंतर जी घटना घडली त्याबाबत सर्व माहिती सर्वोच्च न्यायालयात सादर केली जाणार असल्याचेही सांगण्यात आले संपूर्ण प्लॅन करून हा प्रकार घडवण्यात आला असून यामध्ये ट्रस्टीना अडकवण्याचा डाव असल्याचा आरोप अब्दुल गफार अब्दुल कादर यांनी केला आहे.

या प्रकरणामध्ये महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामधील कर्मचाऱ्यांचा दोष नसून ज्या अधिकाऱ्याने या पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले त्यावर योग्य ती कारवाई होण्यासाठी पुढील काळात कायदेशीर लढाई लढणार असल्याचेही ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले आहे.

advertisement

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular