अहिल्यानगर दिनांक 7 ऑक्टोबर
नगर मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आ अवमानकारक मजकूर लिहिलेले कागद दोन प्लास्टिक पिशव्यांमध्ये टाकून त्या पिशव्या उड्डाणपुलावरून इम्पिरियल चौकात फेकण्यात आल्याचा प्रकार ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी समोर आला होता. या प्रकरणी अज्ञात घ समाजकंटकाविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत योगेश वसंत थोरात (रा. रयत शिक्षण संस्था कार्यालयासमोर, बुरूडगाव बी रोड) यांनी फिर्याद दिली होती .

या घटने बाबत आंबेडकरवादी समाज संतप्त झाला होता.अनेक संघटनांनी एकत्र येऊन आज जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे जाऊन वाईट कृत्य करणाऱ्या आरोपीला लवकरात लवकर पकडावे अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे केली होती. पोलिसांनी शेकडो सीसीटीव्ही फूटेज तपासून अखेर हे कृत्य करणाऱ्या फरीद सुलेमान खान आलमगीर या आरोपीला शोधून काढले असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.





