अहमदनगर दि.१४ सप्टेंबर
अहमदनगर शहर सहकारी बँकेत (ahmednager shahar sahkari bank) तारण ठेवलेले तब्बल सहा किलो सोने बनावट असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. बनावट सोने बँकेत ठेवून १७ खातेदारांच्या नावे २ कोटी २० लाखांचे (2 crore fraud)कर्ज घेतले असून, हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
शहर सहकारी बँकेतील बनावट सोने तारण प्रकरणी गोल्ड व्हॅल्युअरसह( gold vhaluar ) सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच हॉलमार्कचा शिक्का मारण्यासाठी वापरलेले मशीनही पोलिसांनी जप्त केले. गोल्ड व्हॅल्यूअर अजय किशोर कपाले हा बेंन्टेक्सच्या दागिन्यांवर(Bentex jewelery) हॉलमार्कचा (stamping hallmarks ) शिक्का मारून किंमत ठरवित होता. अगदी काही सेकंदात हॉलमार्क शिक्का बेन्टेक्स दागिन्यावर मारला जात होता याचे प्रात्यक्षिक आरोपीने पोलिसांना करून दाखवले आहे.
पहा व्हिडिओ