Homeखेळबास्केटबॉल स्पर्धा आमदार चषकावर पुण्याच्या डेक्कन पुणे संघाने कोरले नाव तर उपविजेता...

बास्केटबॉल स्पर्धा आमदार चषकावर पुण्याच्या डेक्कन पुणे संघाने कोरले नाव तर उपविजेता ठरला बीड संघ उत्कंठा पूर्वक झालेल्या शेवटच्या सामन्यात पुण्याला दहा तर बीड संघाला मिळाले आठ गुण

advertisement

अहमदनगर दि.२० जून
कै. सुनील मगर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आमदार चषक बास्केटबॉल स्पर्धेत पुण्याचा पुणे डेक्कन संघाने बीड संघावर मात करत आमदार चषकावर आपले नाव कोरले तर उपविजेता बीड संघ ठरला असून नगरचा डाउन टाऊन संघाने तृतीय तर सारडा कॉलेज संघाने चौथा क्रमांक पटकावला आहे.प्रथम विजेत्या संघास पंधरा हजार रुपये रोख आणि ट्रॉफी देण्यात आली तर उपविजेत्या संघास दहा हजार रुपये रोख आणि ट्रॉफी देण्यात आली.

सावेडी उपनगर मधील जॉगिंग ट्रॅक वर दोन दिवस आमदार चषक बास्केटबॉल स्पर्धांचा थरार रंगला होता अनेक सामने अत्यंत चुरशीची झाले एकूण आठ संघाने या स्पर्धेत सहभाग घेतला होता. अंतिम स्पर्धेत पुण्याचा पुणे डेक्कन संघाने बीड संघाने धडक मारली होती अंतिम सामना हा अत्यंत चुरशीचा झाला होता मिनिटाला सामना दोन्ही संघाच्या बाजूने झुकत असल्याने प्रेक्षकांना हा सामना कोण जिंकेल याची उत्कंठा लागून होती अखेर पुण्याने बीड संघावर 2 गुणांनी विजय मिळवला.

या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, महानगर पालिकेचे विरोधी पक्षनेते संपत बारस्कार, यांच्या हस्ते करण्यात आला या वेळी डॉ.भूषण अनुभुले, कैलास शानबाग, संजय ढोणे, वेदपाल तन्वर, प्रा, सुनील जाधव,डॉ. भूषण अनभुले ,शिवाजीत डोके,केतन क्षीरसागर ,श्‍याम सानप ,सत्येन देवळालीकर, संजय वायकर ,ओमसिंग बायस, सचिन भापकर ,दिनेश भाटिया आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्राध्यापक माणिक विधाते यांनी सांगितले की दोन वर्षाच्या कोरोना कालावधीनंतर पुन्हा एकदा आता सर्वाच गोष्टी सुरू झाल्या असून दोन वर्षात अनेक ठिकाणी स्पर्धा बंद होत्या त्यामुळे आता खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी आणि त्यांना बळ देण्यासाठी अशा स्पर्धा ,भरवून दोन वर्षात जे सर्व थांबले होते ते आता पुन्हा सुरु करण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून सुरू झाले असून आमदार संग्राम जगताप यांनी आमदार निधीच्या माध्यमातून सुसज्ज असे बास्केटबॉल मैदान आपल्याला उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे भविष्यात अनेक खेळाडू या मैदानाच्या माध्यमातून तयार होऊन राज्यपातळीवर देश पातळीवर आपलं नाव कमवतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. कोराना नंतर आता शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी प्रत्येकाने मैदानावर येणे गरजेचे असून खेळाडूंनीही पुन्हा एकदा त्याच जोशात खेळ खेळून आपले कर्तृत्व सिद्ध करावे असेही त्यांनी सांगितले.

महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी बोलताना सांगितले की जो संघ हरला आहे त्यांच्या मुळेच विजेत्या संघाला हा चषक मिळालं आहे. त्यामुळे हरलेल्या संघाने खचून न जाता पुढील काळात आपला विजय कसा होईल याकडे लक्ष देऊन जिद्दीने खेळ खेळत राहावे सध्याच्या परिस्थितीत खेळायला फार महत्व असून आपली शारीरिक तंदुरुस्ती ठेवण्यासाठी खेळ हा प्रत्येकाने खेळणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले महानगरपालिकेच्या माध्यमातून नगर शहरात अनेक ठिकाणी विविध खेळांचे मैदान अत्याधुनिक पद्धतीने तयार करण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

मा. नगरसेवक अजिंक्य बोरकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विधानसभा शहराध्यक्ष सुमित कुलकर्णी आणि राष्ट्रवादी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र भांडवलकर तसेच अहमदनगर जिल्हा बास्केटबॉल संघटना तसेच अजिंक्य युवा प्रतिष्ठान, केसरी सोशल फाउंडेशन, शिवमुद्रा ग्रुप व एसबीसी बास्केटबॉल क्लब यांच्या संयुक्त आमदार चषक बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत पंच म्हणून नितीन शिनगारे, सचिन भापकर,सत्येनं देवळालीकर ,ओम सिंग बायस रशीद शेख, सचिन आळकुटे संजय वायकर, योगेश भिंगारदिवे यांना भूमिका बजावली तर विजय पवार ,चेतन दुर्गे, राजू मंगलाराम, राहुल जाधव आदींनी सहकार्य केले होते

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular