Homeशहरआमदार चषक बास्केटबॉल स्पर्धेचा आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते शुभारंभ सावेडी मधील...

आमदार चषक बास्केटबॉल स्पर्धेचा आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते शुभारंभ सावेडी मधील जॉगिंग ट्रॅक वरील बास्केटबॉल मैदानावर दोन दिवस रंगणार स्पर्धा

advertisement

अहमदनगर दि.१५ जून
कै. सुनील मगर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आमदार चषक बास्केटबॉल स्पर्धेचा शुभारंभ शनिवारी आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आला या वेळी कैलास शानबाग, संजय ढोणे, वेदपाल तन्वर, प्रा, सुनील जाधव,डॉ. भूषण अनभुले ,शिवाजीत डोके,केतन क्षीरसागर ,श्‍याम सानप ,सत्येन देवळालीकर, संजय वायकर ,ओमसिंग बायस, सचिन भापकर ,दिनेश भाटिया आदी मान्यवर उपस्थित होते.

अहमदनगर शहरातील प्रोफेसर कॉलनी जवळील जॉगिंग ट्रॅक वरील बास्केटबॉल मैदानावर सामने सुरू असून पुण्याची डेक्कन विरुद्ध अहमदनगरच्या डाउनटाऊन या दोन संघात शुभारंभाचा सामना खेळवण्यात आला १० गुणांनी डेक्कन पुणे या संघाने हा सामना जिंकला.

मा. नगरसेवक अजिंक्य बोरकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विधानसभा शहराध्यक्ष सुमित कुलकर्णी आणि राष्ट्रवादी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र भांडवलकर तसेच अहमदनगर जिल्हा बास्केटबॉल संघटना तसेच अजिंक्य युवा प्रतिष्ठान, केसरी सोशल फाउंडेशन, शिवमुद्रा ग्रुप व एसबीसी बास्केटबॉल क्लब यांच्या संयुक्त आमदार चषक बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेत महाराष्ट्रातून ८ संघ सहभागी झाले असून धुळे, बीड,सोलापूर, पुणे, येथून संघ दाखल झाले आहेत या सामन्यांना रेफ्रि म्हणून मुंबई येथील रशिद सर,कोल्हापूर चे आशिष सर, अहमदनगर मधील सचिन भापकर,सोलापूर येथील चपळगावकर सर,बीड येथील सचिन आळकुटे, आणि नगर शाहरतील कैलास शानबाग संजय ढोणे हे काम पाहणार आहेत.

दिनांक १८ जून ते १९ जून दरम्यान सावेडी येथील जॉगिंग ट्रॅक वर सामन्यांचा थरार रंगणार आहे. आ. संग्राम जगताप यांच्या निधीतून उभा करण्यात आलेल्या बास्केटबॉल मैदानावर ही पहिलीच स्पर्धा होणार असून खेळाडूंनी स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन अजिंक्य बोरकर, समीर कुलकर्णी ,गजेंद्र भांडवलकर तसेच अहमदनगर बास्केटबॉल संघटना एसबीसी बास्केटबॉल संघटना यांच्या वतीने करण्यात आले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular