Homeशहरशिवराष्ट्र सेनेच्या माध्यमातून महिलांच्या न्याय हक्कासाठी लढा उभारणार - महिला आघाडी प्रमुख...

शिवराष्ट्र सेनेच्या माध्यमातून महिलांच्या न्याय हक्कासाठी लढा उभारणार – महिला आघाडी प्रमुख रोहिणी पवार

advertisement

अहमदनगर- दि.२७ ऑगस्ट

भिंगार शहरात शिवराष्ट्र सेना या पक्षामध्ये युवक, महिला मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. नुकतेच भिंगार येथील महिलांचा पक्षप्रवेश झाला. त्याचवेळी भिंगार महिला शहराध्यक्षपदी सौ. सुनीता दिलिप चौहान, उपाध्यक्ष सौ. शीतल पुष्कराज चोटिले व सचिवपदी सौ. वैशाली भिंगारदिवे यांची नियुक्तीचे पत्र शिवराष्ट्र सेनेच्या महिला आघाडी प्रमुख सौ. रोहिणी पवार यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी शिवराष्ट्र सेना पक्षाचे अध्यक्ष संतोष नवसुपे, नगर राष्ट्रीय शहर प्रमुख मनोज औशीकर, भिंगार शहराध्यक्ष राकेश सारवान, उपाध्यक्ष कुणाल बैद, सावेडी प्रमुख देवदत्त पुजारी आदी उपस्थित होते:

यावेळी बोलताना महिला आघाडी प्रमुख रोहिणी पवार म्हणाल्या, शिवराष्ट्र सेनेच्या माध्यमातून राजकारण न करता सर्व स्तरातील महिलांच्या न्याय हक्कासाठी लढण्याचे हे एक व्यासपीठ असून शिवराष्ट्र सेनेच्या माध्यमातून महिलांच्या हक्कासाठी लढणार असून त्याचबरोबर आपल्या धर्मावर व देशावर येणार संकट हे प्रत्येक स्त्री-पुरुषांना संघर्ष करणे व ते परतून लावणं हे आपलं कर्तव्य आहे. तो लढा शिवराष्ट्र सेना पक्षाच्या माध्यमातून हाती घेतलेला आहे, असे सौ. पवार यांनी सांगितले.

याप्रसंगी सौ. सुनिता शिव राष्ट्र चौहान यांनी पक्षाच्या माध्यमातून महिलांचे संघटन करुन महिलांचे प्रश्नाबरोबर वडारवाडी, त्याचबरोबर भिंगार, नागरदेवळे,सौरभनगर भागातील मुलभूत सुविधा मिळविण्यासाठी लढा उभा करु, असे सांगितले.

 

याप्रसंगी राकेश सारवान यांनी शिव राष्ट्र पक्षाच्यावतीने सुरु असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. उपाध्यक्ष कुणाल बैद यांनी सूत्रसंचालन केले तर देवदत्त पुजारी यांनी आभार मानले.

advertisement

Previous article
Next article

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular