अहिल्यानगर दि.१७ नोव्हेंबर
गुंगीचे औषध देऊन २०१९ मध्ये जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतर २०२३ पर्यंत विविध आमिषे दाखवून वेळोवेळी अत्याचार केल्याप्रकरणी श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या विरोधात राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता याप्रकरणी त्यांना पोलिसांनी अटक केली होती सध्या ते न्यायालयीन कोठडीत होते.
जामीन मिळावा याकरता त्यांनी अहमदनगरच्या जिल्हा न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता मात्र जिल्हा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर भानुदास मुरकुटे यांनी औरंगाबाद खंडपीठात जामीन मिळावा यासाठी ॲड. राहुल करपे आणि ॲड. महेश तवले यांच्यामार्फत जामीन अर्ज दाखल केला होता.
औरंगाबाद खंडपीठात आरोपीचे वकील ॲड. राहुल करपे आणि ॲड. महेश तवले यांनी करून जोरदार युक्तिवाद केला. सरकारी पक्ष आणि आरोपी पक्ष यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर औरंगाबाद खंडपीठाने आरोपी भानुदास मुरकुटे यांना अटी आणि शर्तीवर जामीन मंजूर केला असून यामुळे आता त्यांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी शेवटचे दोन दिवस उरले असून भानुदास मुरकुटे यांना न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने श्रीरामपूर विधानसभेची निवडणुकीचे चक्र पुन्हा एकदा फिरू शकतात त्यामुळे आता ती बाहेर कधी येतात याकडेच त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागले आहे.